Political News : ... तर अजित पवारांच्या गाडी समोर उडी मारेन, मराठा आंदोलक आक्रमक

Kolhapur News : मराठ्यांसाठी तुम्ही काय करु शकत नसाल तर त्या खुर्चीचा उपयोग काय?
Ajit PAwar
Ajit PAwarSaam TV
Published On

रणजीत माजगावकर

Kolhapur News :

मराठा समाजाला आरक्षण देण्यात शिंदे-फडणवीस सरकार टाळाटाळ करत आहे. १० सप्टेंबरला कोल्हापुरामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा दौरा आहे. या दौऱ्यावेळी अजित पवार यांच्या गाडीसमोर उडी मारण्याची आणि त्यांना काळे झेंडे दाखवून तीव्र निदर्शने करण्यात येणार असल्याचा इशारा मराठा समाजातील नेत्यांनी दिला आहे.

शिवसेना जिल्हाप्रमुख आणि सकल मराठा संघटनेचे नेते संजय पवार यांनी म्हटलं की, सकल मराठा संघटनेच्या नेतृत्वाखाली मी काम करत आहे. मी शिवसेनेचा जिल्हाप्रमुख असलो तरी संघटनेचं म्हणणं ऐकून घेतल्याशिवाय मी पुढे जाणार नाही. (Political News)

Ajit PAwar
Sanjay Shirsat News : राज्यातील एका ज्येष्ठ नेत्यानं मराठा आंदोलन चिथवलं; शिंदे गटाच्या आमदाराचा मोठा दावा

माझी इच्छी मी बोलून दाखवली. किती दिवस आम्ही रस्त्यावर उतरायचं. अनेक वर्षांपासून हे सुरु आहे. अजित पवार येत्या १० सप्टेंबरला कोल्हापुरात येत आहेत. ते चांगले उपमुख्यमंत्री, चांगले नेते आहेत. सर्वात महत्त्वाचे ते मराठा आहेत. (Latest Marathi News)

मराठ्यांसाठी तुम्ही काय करु शकत नसाल तर त्या खुर्चीचा उपयोग काय? कशासाठी त्या खुर्चीवर बसता. लाथ मारायला हवी त्या खुर्चीला, असं संजय पवार यांनी म्हटलं.

Ajit PAwar
Political News : 'इंडिया' आघाडीला शह देण्यासाठी केंद्र सरकारचा नवा डाव, विशेष अधिवेशनात इंडिया शब्द हटवण्यासाठी विधेयक येणार?

तुमचा आदेश नसताना जालन्यात मराठा आंदोलकांवर लाठीहल्ला झाला, असं सांगताय. मात्र हा लाठीहल्ला ४० जणांवर नाही तर राज्यातील ४ कोटी जनतेवर आहे, अशी आमची भावना आहे. जर यांनी मला आदेश दिला तर अनेक मराठा समाजाच्या लोकांना घेऊन अजित पवारांच्या गाडीखाली मी उडी मारेन, असं संजय पवार यांनी म्हटलं.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com