DCM Kartiki Mahapuja: कार्तिकी महापूजेवरून सकल मराठा समाजात फूट, उपमुख्यमंत्री पंढरपुरात जाणार का?

DCM Kartiki Mahapuja:पंढरपुरात कार्तिकी यात्रेनिमित्त होणाऱ्या विठ्ठलाच्या शासकीय महापूजेवरून पंढरपुरातील सकल मराठा समाजामध्ये दोन गट पडले आहेत.
DCM Kartiki Mahapuja
DCM Kartiki MahapujaSaam Digital
Published On

DCM Kartiki Mahapuja

पंढरपुरात कार्तिकी यात्रेनिमित्त होणाऱ्या विठ्ठलाच्या शासकीय महापूजेवरून पंढरपुरातील सकल मराठा समाजामध्ये दोन गट पडले आहेत. एका गटाने उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते शासकीय महापूजा करण्यास आपला विरोध नसल्याचे स्पष्ट केले आहे. मात्र मराठा क्रांती मोर्चाने उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणाऱ्या शासकीय महापूजेला आपला विरोध कायम असल्याची भूमिका घेतली आहे.

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी पंढरपुरात सकल मराठा समाजाच्या वतीने 8 सप्टेंबर पासून तहसील कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन सुरू आहे. या आंदोलनादरम्यान सकल मराठा समाजाने उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणाऱ्या विठ्ठलाच्या शासकीय महापूजेला विरोध दर्शवला होता. कालपर्यंत सकल मराठा समाज आपल्या निर्णयावर ठाम असतानाच आज मात्र काही पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषद घेऊन उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणाऱ्या कार्तिकी शासकीय महापूजेला विरोध नसल्याची भूमिका मांडली आहे.त्यानंतर लगेचच मराठा क्रांती मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणाऱ्या शासकीय महापूजेला आपला विरोध कायम असल्याची भूमिका मांडली आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

DCM Kartiki Mahapuja
Bhujbal On World Cup Final: तुर्तास सगळं विसरा.. वर्ल्ड कप फायनलचा आनंद लुटा, तणावाच्या पार्श्वभूमीवर छगन भूजबळ यांचं आवाहन

दोन परस्पर भूमिकांमुळे पंढरपुरातील सकल मराठा समाजामध्ये विठ्ठलाच्या शासकीय महापूजेवरून दोन गट पडले आहेत. सकल मराठा समाजाचे माजी उपनगराध्यक्ष नागेश भोसले यांनी उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणाऱ्या शासकीय महापूजेला आमचा विरोध नसल्याचे स्पष्ट केले आहे. त्यानंतर मराठा क्रांती मोर्चाचे राज्य समन्वयक रामभाऊ गायकवाड यांनी उपमुख्यमंत्र्यांनी विठ्ठलाच्या शासकीय महापूजेसाठी पंढरपुरात येऊ नये, अन्यथा होणाऱ्या परिणामास सरकार जबाबदार असेल असा थेट इशारा दिला आहे. सकल मराठा समाजामध्ये दोन गट पडल्याने उपमुख्यमंत्री कार्तिकी महापूजेला पंढरपुरात येणार का याकडे लक्ष लागले आहे.

DCM Kartiki Mahapuja
Kunbi Records: कुणबी नोंदी तपासण्यासाठी १३ मोडी लिपी अभ्यासकांची टीम तयार; प्रशासनाचे युद्धपातळीवर प्रयत्न सुरू

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com