Santosh Deshmukh Case: संतोष देशमुखांच्या मारेकऱ्यांना फाशी द्या, मराठा क्रांती मोर्चाकडून जालन्यात जनआक्रोश मोर्चा

Jalna Janaakrosh Morcha: संतोष देशमुख हत्या प्रकरण फास्टट्रॅकवर चालवावे आणि देशमुख कुटुंबांला आर्थिक मदत करावी असे सरकारला निवेदन देण्याचा निर्णय मराठा समाजाच्या बैठकीत घेण्यात आला.
Maratha Kranti Morcha
Beed Sarpanch Santosh Deshmukh Case Saam tv
Published On

Jalna News: बीडच्या मस्साजोग गावातील सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झाली. या हत्याप्रकरणात वाल्मीक कराडला सीआयडीने अटक केली आहे. तर फरार संशयित आरोपींना पकडण्यासाठी पोलिसांचे शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत. दरम्यान संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना कठोर शिक्षा व्हावी यासाठी जालन्यामध्ये जनआक्रोश मोर्चा काढण्यात येणार आहे.

मराठा समाजाची बैठक आज (३ जानेवारी) पार पडली. या बैठकीला मराठा क्रांती मोर्चा आणि मराठा समाजातील अनेक जण उपस्थित होते. संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी यासाठी १० जानेवारी रोजी जालन्यामध्ये जनआक्रोश मोर्चा काढण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक अरविंद देशमुख यांनी ही माहिती माध्यमांना दिली आहे.

मराठा समाजाच्या बैठकीमध्ये सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण फास्ट ट्रॅक न्यायालयात चालवण्यात यावे यासाठी राज्य शासनाकडे निवेदन देण्याचाही निर्णय घेण्यात आला. याशिवाय देशमुख यांच्या कुटुंबाला शासनाकडून आर्थिक सहाय्य मिळावं, यासाठीही मराठा क्रांती मोर्चाच्या माध्यमातून सरकारला विनंती केली जाणार आहे.

Maratha Kranti Morcha
Walmik Karad : वाल्मिक कराडला पोलीस कोठडीत हवा असिस्टंट; कोर्टाने काय दिला निर्णय? | VIDEO

संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील आरोपी सध्या फरार आहेत. तेव्हा मस्साजोग ग्रामस्थांनी संतोष देशमुख यांच्या कुटुंबाला आणि बंधू धनंजय देशमुख यांना संरक्षण देण्याची मागणी केली. लगेच ग्रामस्थांची मागणी मान्य करत देशमुख कुटुंबियांना पोलिसांकडून संरक्षण देण्यात आले.

Maratha Kranti Morcha
Beed Case: संतोष देशमुख यांच्या भावाला पोलिस संरक्षण, मस्साजोग ग्रामस्थांची मागणी मान्य

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com