मराठा आरक्षणासंदर्भात 4 जुलैला सोलापुरात आंदोलन

अनेक वर्षांपासून मागणी असलेले मराठा समाजाचे आरक्षण सर्वोच्च न्यायलयाने रद्द केल्यानंतर आता पुन्हा एकदा मराठा समाज आक्रमक झालेला आहे
४ जुलै दिवशी मराठा समाजाचा सोलापुरात मोर्चा; नरेंद्र पाटलांची घोषणा
४ जुलै दिवशी मराठा समाजाचा सोलापुरात मोर्चा; नरेंद्र पाटलांची घोषणाSaam Tv
Published On

विश्वभूषण लिमये

सोलापूर : अनेक वर्षांपासून मागणी असलेले मराठा Maratha समाजाचे आरक्षण Reservations सर्वोच्च न्यायलयाने Supreme Court रद्द केल्यानंतर आता पुन्हा एकदा मराठा समाज आक्रमक झालेला आहे. आपल्या मागण्यांसाठी मराठा समाजाकडून राज्यभर State वेगवेगळे आंदोलने सुरू करण्यात आली आहेत.

या मोर्चामध्ये सोलापूर Solapur शहर- जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील मराठा बांधव लाखोंच्या संख्येने उपस्थितीत राहणार आहेत. या मोर्चाचे नेतृत्व मराठा समाजाचे नेते, आण्णासाहेब पाटील, आर्थिक विकास महामंडळाचे माजी अध्यक्ष नरेंद्र पाटील हे करणार आहेत. या पार्श्वभूमीवर मराठा समाजाला एसईबीसी SEBC किंवा ओबीसी OBC कोट्यामधून आरक्षण मिळावे.

पहा व्हिडिओ-

या मागणीकरीता सोलापूर जिल्ह्यामधील मराठा बांधवांच्या मागण्या मराठा क्रांती मोर्चाच्या माध्यामातून भव्य असा मोर्चा काढणार आहेत. हा मोर्चा येत्या ४ जुलै दिवशी सोलापूर शहरातून काढण्यात येणार आहे. याचबरोबर या मोर्चासाठी छत्रपती उदयनराजे भोसले, छत्रपती संभाजीराजे, आणि खासदार नारायण राणे, शिवेंद्र राजे भोसले आदी नेत्यांना निमंत्रित करण्यात येणार आहे.

४ जुलै दिवशी मराठा समाजाचा सोलापुरात मोर्चा; नरेंद्र पाटलांची घोषणा
...म्हणून मराठा समाजाचा उद्रेक झाला आणि ते आक्रमक झाले - शरद पवार 

सोलापुरातील शासकीय विश्रामगृहात Government Rest House झालेल्या या पत्रकार परिषदेत ही माहिती देण्यात आली आहे. यावेळी, पत्रकार परिषदेला मराठा समाजाचे नेते नरेंद्र पाटील, सोलापूर जिल्हा समन्वयक राम जाधव, किरण पवार, श्रीकांत घाडगे, सोमनाथ राऊत, प्रताप कांचन आदी नेत्यांची उपस्थितीत होते.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com