Maratha Andolan: काही प्रांत आणि स्वतःसाठी आंदोलन असेल तर आमचा विरोध; मनोज जरांगेंच्या उपोषणावर मराठा आक्रोश मोर्चाची भूमिका

Maratha Andolan: 'काही प्रांत आणि स्वतःसाठी आंदोलन असेल तर आमचा विरोध, अशी भूमिका मनोज जरांगे यांच्या उपोषणावर मराठा आक्रोश मोर्चाचे समन्वयक किरण पवार यांनी केली आहे.
Maratha Arakshan Andolan
Maratha Arakshan AndolanSaam tv
Published On

Maratha andolan News:

जालन्यात गेल्या काही दिवसांपासून मराठा आंदोलक मनोज जरांगे उपोषणासाठी बसले आहेत. जरांगे यांच्या उपोषणानंतर मराठा आरक्षणाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. मनोज जरांगे यांच्या उपोषणानंतर मुख्यमंत्र्यांनी महसूल नोंदी असणाऱ्यांना कुणबी दाखले मिळणार असल्याची घोषणा केली आहे. याचदरम्यान, 'काही प्रांत आणि स्वतःसाठी आंदोलन असेल तर आमचा विरोध, अशी भूमिका मनोज जरांगे यांच्या उपोषणावर मराठा आक्रोश मोर्चाचे समन्वयक किरण पवार यांनी केली आहे. (Latest Marathi News)

सोलापूरमधील मराठा आक्रोश मोर्चाचे समन्वयक किरण पवार यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. किरण पवार म्हणाले, 'जालना येथे मराठा बांधवांवर लाठीहल्ला झाला त्याचा निषेध करतो. जालना येथे मनोज जरांगे पाटील उपोषणाला बसले ते फक्त मराठवाड्यासाठी बसले आहेत. 1960 मध्ये निजामशहा सरकारमध्ये विलीन झालेले आणि हैदराबाद संस्थांमध्ये कुणबी मराठा होते, ते आता बसले आहेत'.

Maratha Arakshan Andolan
Manoj Jarange Patil: मनोज जरांगे उपोषण मागे घेणार? उद्या 11 वाजता घेणार निर्णय; खोतकर यांनी दिली महत्वाची माहिती

'मनोज जरांगे यांनी जाहीर करावं की, महाराष्ट्रातील सर्व मराठ्यांना कुणबी मराठा व ओबीसीमधून आरक्षण मिळणार असेल तर मराठा क्रांती मोर्चा आणि मराठा आक्रोश मोर्चा त्यांच्यासोबत असेल. काही प्रांत आणि स्वतःसाठी आंदोलनाला बसले असतील तर आमचा विरोध असेल, अशी भूमिका किरण पवार यांनी स्पष्ट केली.

'मराठा समाजामध्ये जितक्या पोटजाती होत्या. बारा बलुतेदार सगळे मराठा होते, त्यांच्या धंद्याप्रमाणे त्यांच्या जाती पडत गेल्या. नंतरच्या काळात ओबीसीमध्ये समावेश झाला. कुणबी म्हणजे शेतकरी. आम्ही शेतकरी आहोत, असे ते म्हणाले.

'जेव्हा कुणबी मराठावर अन्याय होतो, तेव्हा मराठा समाज सोबत असतो. परंतु आरक्षणाचा विषय येतो, तेव्हा कुणबी मराठा आमचा संबंध नाही अशी भूमिका घेतात. मराठा आरक्षणाच्या बैठकीला काही कुणबी बांधव असतात. ते अण्णासाहेब पाटील, सारथी योजनेचा लाभ घेतात. त्यांना दुहेरी लाभ मिळतो. त्यावेळेस मराठा समाजाचे नुकसान होते, असे किरण पवार म्हणाले.

'मनोज जरांगे हे सहा जिल्ह्यासाठी मराठा आरक्षणासाठी बसले आहेत. महाराष्ट्रातील युवकांमध्ये संभ्रम निर्माण होत आहे. मराठा आरक्षणासाठी लढा देत आहेत असं वाटत आहे.परंतु मराठवाड्यातील मराठा समाजासाठी ते त्यांनी जाहीर केलं पाहिजे, असे किरण पवार पुढे म्हणाले.

Maratha Arakshan Andolan
Maratha Andolan: 'आरक्षणासाठी पुरावे देतो आजच भेटायला या', मनोज जरांगे यांचं सरकारला आवाहन

'अनेक मोठे नेते कुणबी मराठा म्हणून आरक्षण द्यावे असे कधीच म्हणाले नाही. कारण त्यांच्या ताटातील ते आम्हाला देणार नाहीत. मराठा समाजातील युवक एसटी फोड आक्रमक आंदोलन करत आहेत, मागील काळात मोर्चा झाल्यावर त्यावेळेस हे मराठा बांधव कुठे गेले होते. ओबीसीमधून आरक्षण द्यावे ही पहिली मागणी होती, असे किरण पवार यांनी सांगितले.

'जरांगे पाटील यांना विनंती आहे की, महाराष्ट्रातील मराठ्यांना कुणबी मराठा म्हणून सामावून घेत असतील तर मराठा आक्रोश मोर्चा त्यांच्याबरोबर असेल . ते मराठवाड्यासाठी आंदोलन करत असतील तर आमचा त्यांना विरोध राहील, अशी भूमिका मराठा आक्रोश मोर्चाच्या किरण पवार यांनी स्पष्ट केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com