Manoj jarange: मनोज जरांगे पुन्हा मैदानात, शेतकरी संघटनांना जरांगेंची हाक

Jarange Gears Up for Massive Agricultural Protest: मनोज जरांगे पुन्हा एकदा ऐतिहासिक आंदोलन छेडण्याच्या तयारीत आहेत...मात्र मनोज जरांगे कोणत्या विषयावर आंदोलन छेडणार आहेत.... त्यासाठी कशी तयारी करणार आहेत?
Manoj Jarange addressing farmers’ leaders ahead of the statewide debt waiver protest.
Manoj Jarange addressing farmers’ leaders ahead of the statewide debt waiver protest.Saam Tv
Published On

मराठा आरक्षणासाठी मुंबई जाम करणाऱ्या मनोज जरांगे आता शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यावर मैदानात उतरणार आहेत..त्यासाठी मनोज जरांगेंनी 2 नोव्हेंबरला राज्यातील सगळ्याच शेतकरी संघटना आणि अभ्यासकांना आंतरवली सराटीतील बैठकीसाठी साद घातलीय...कधी शेतीसंदर्भातील सरकारची धरसोडीची धोरणं,तर कधी दुष्काळाने शेतकरी मेटाकुटीला आलाय.. हे कमी होतं की काय, यंदा अतिवृष्टीने राज्यात 70 लाख हेक्टर पिकांचं नुकसान झालंय.. त्यामुळे शेतकरी उद्ध्वस्त झालाय.. याच उद्ध्वस्त झालेल्या बळीराजाला कर्जमुक्त कऱण्यासाठी आधी बच्चू कडूंनी आंदोलनाची हाक दिलीय.. तर आता बच्चू कडूंपाठोपाठ जरांगेंनीही सगळ्या शेतकरी संघटनांना साद घातलीय..

दुसरीकडे आतापर्यंत मराठा आरक्षणासाठी 2023 पासून सातत्याने नाकेबंदी करणाऱ्या मनोज जरांगेंनी हैदराबाद गॅझेटियरचा जीआर मिळवलाय.. मात्र त्यासाठी जरांगेंना 7 वेळा आंदोलन करावं लागलंय.. आता शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर जरांगेंनी आंदोलनाची हाक दिली असली तरी सरकार जरांगेंच्या आंदोलनाची दखल घेऊन पिकांच्या हमीभावासोबतच कर्जमाफीची मागणी मान्य होणार की आतापर्यंतच्या शेतकरी आंदोलनाप्रमाणे हे आंदोलनंही दडपलं जाणार? याकडे राज्याचं लक्ष लागलंय...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com