Manoj Jarange Patil
Manoj Jarange PatilSaam TV

Manoj Jarange Patil: जरांगे पाटलांच्या दौऱ्यावेळी अपघात; कार्यकर्त्याच्या पायावरून गेले गाडीचे चाक

Trimbakeshwar Accident: नाशिकच्या त्र्यंबकेश्वर येथे जरांगे पाटलांच्या सभेवेळी एक कार्यकर्ता जखमी झाला.
Published on

तबरेज शेख

Nashik News:

मनोज जरांगे पाटील यांनी आज नाशिकच्या त्र्यंबकेश्वर येथे सभा घेतली. या सभेवेळी एक कार्यकर्ता जखमी झालाय. आप्पासाहेब कुडेकर असे जखमी कार्यकर्त्याचे नाव असून, त्यांच्या पायाच्या पंजावरून गाडीचे चाक गेल्याने दुखापत झालीये. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Manoj Jarange Patil
Bus Accident: कल्याण-नगर महामार्गावर विचित्र अपघात; एसटी बसच्या धडकेत दुचाकीस्वारांचा गेला जीव, भयानक घटना

कुडेकर यांना नाशिक (Nashik) शहरातील एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मनोज जरांगे पाटील यांनी देखील दवाखान्यात जखमी कुडेकर यांची भेट घेतली. डॉक्टरांनी कुडेकर यांच्यावर उपचार केले असून, ते आता ठिक असल्याची माहिती जरांगे पाटील यांनी दिलीये. तसेच त्यांना आता संभाजीनगर येथील गॅलेक्सी हॉस्पिटलमध्ये दाखल केले जाणार आहे. जरांगे पाटील यांनी कार्यकर्त्यांना शांततेत चालण्याचे आणि ढकलाढकली न करण्याचे आवाहन केले आहे.

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी राज्यभर आपला दौरा सुरू केलाय. राज्यात विविध ठिकाणी भेट देत सभा घेताना जरांगेंच्या स्वागतासाठी मोठा जनसमुदाय जमा होतोय. जरांगेंच्या स्वागतावेळी प्रत्येक गावात रस्त्यांवर नागरिकांची मोठी गर्दी आणि फुलांची उघळण पाहायला मिळतेय. नाशिकच्या त्र्यंबकेश्वरमध्ये देखील जरांगे पाटलांचे स्वागत करण्यासाठी अशीच गर्दी जमली होती.

जरांगे पाटील यांची सभा ऐकण्यासाठी आप्पासाहेब कुडेकर देखील तेथे उपस्थित होते. मात्र नागरिकांची गर्दी आणि वाहनांचा ताफा यात त्यांच्या पायाचा पंजा एका वाहनाच्या चाकाखाली आला. यात त्यांना मोठी दुखापत झाली.

त्र्यंबकेश्वरवरून जरांगे पाटील आता निघाले असून नाशिक शहरात दाखल झाले आहेत. इथेही ठिकठिकाणी त्यांच्या स्वागताची तयारी करण्यात आलीये. मनोज जरांगे पाटील पुढे भगूर येथील सावरकरवाडा येथे जाणार आहेत. त्यानंतर सभेच्या दिशेने ते रवाना होतील.

Manoj Jarange Patil
Uttarakhand Tunnel Accident: उत्तरकाशीतील बोगद्यात अडकलेले मजूर सुटकेचा नि:श्वास घेणार, मजुरांचा जीव वाचविण्साठी ५ प्लान तयार

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News Saam TV
saamtv.esakal.com