Manoj jarange patil
Manoj jarange patilsaam Tv

Maratha Reservation : मनोज जरांगेंची उपोषणाच्या तिसऱ्या दिवशी तब्येत खालावली, डॉक्टरांना तपासणी करण्यासही दिला नकार

Manoj Jarange Hubger strike for Maratha Reservation : मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाचा आजचा तिसरा दिवस आहे. मनोज जरांगे पाटील यांची तब्येत आज काही प्रमाणात खालवली आहे.
Published on

Jalna News :

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलक मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा आमरण उपोषणाला बसले आहेत. अंतरवाली सराटी गावात मनोज जरांगे पाटील यांनी हे आंदोलन सुरु आहे. आंदोलनाचा आजचा तिसरा दिवस आहे. मनोज जरांगे पाटील यांची तब्येत आज काही प्रमाणात खालवली आहे.

मनोज जरांगे पाटील यांनी तीन दिवसापूर्वी आंदोलनाला सुरुवात केली आहे. त्यांनी दोन दिवस पाणीही न घेतल्याने त्यांची तब्येत खराब झाली आहे. तसेच त्यांनी आता डॉक्टरांना तपासणी करण्यास देखील नकार दिला आहे.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Manoj jarange patil
Maharashtra Politics : मनसे महायुतीसोबत जाणार? लोकसभेसाठी मनसेला २-३ जागा मिळण्याची शक्यता

मागील सहा महिन्यातील मनोज जरांगे पाटील यांची आंदोलन करण्याची ही तिसरी वेळ आहे. त्यामुळे राज्याच्या कानाकोपऱ्यातून अनेक मराठा बांधव अंतरावाली सराटीमध्ये उपस्थित आहेत.

मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनानंतर मराठा बांधवांना दिलेल्या आश्वासनांच्या पूर्ततेसाठी सरकार सरकरच विशेष अधिवेशन बोलावणार असल्याचं बोललं जात आहे. (Latest Marathi News)

Manoj jarange patil
Dhule News : जरांगे पाटलांच्या भूमिकेला समर्थन; धुळ्यात फॉर्म भरो मोहीम

मनोज जरांगे पाटलांचं उपोषण कशासाठी?

सरकारने मराठा आरक्षणबाबत जी अधिसूचना काढली आहेत त्याची अंमलबजावणी व्हावी यासाठी मनोज जरांगे पाटील आंदोलन करत आहेत. याशिवाय अंतरवाली सराटीसह मराठा आंदोलनादरम्यान मराठा बांधवांवर दाखल गुन्हे मागे घ्यावेत, शासनाने सगेसोयरे यांचा कायदा पास करावा, विधिमंडळाचे दोन दिवसात अधिवेशन घ्यावे, हेदराबाद व इतर ठिकाणचे गॅजेट स्वीकारावे इत्यादी मागणीसाठी अंतरवाली सराटी मनोजच जरांगे पाटील आमरण उपोषण करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com