Manoj Jarange Health Update: मनोज जरांगे यांची प्रकृती खालावली; बसून बोलण्यासही होतोय त्रास

Manoj Jarange Health Update: मनोज जरांगे यांनी उपचाराला नकार देत आंदोलन आणखी तीव्र केलं आहे.
Manoj Jarange Health Update:
Manoj Jarange Health Update:Saam tv

Maratha Andolan News:

जालन्यातील अंतरावाली सराटी गावात गेल्या १४ दिवसांपासून मराठा आंदोलक मनोज जरांगे उपोषणाला बसले आहेत. जरांगे यांनी आजपासून उपाचारांनाही नकार दिला आहे. जरांगे यांनी उपचाराला नकार देत आंदोलन आणखी तीव्र केलं आहे. जरांगे यांची प्रकृती खालावल्याने त्यांनी बसण्यासही त्रास होत आहे. (Latest Marathi News)

मनोज जरांगे यांचे गेल्या १४ दिवसांपासून उपोषण सुरू आहे. कालपासून मनोज जरांगे यांनी अन्न आणि पाणी त्यागलं होतं. त्यानंतर आज डॉक्टरांच्या उपचारासही नकार दिला आहे. प्रकृती खालावल्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी झोपलेल्या अवस्थेतच संवाद साधला.

यावेळी मनोज जरांगे म्हणाले, 'आरक्षण हाच माझ्यावर उपचार आहे. तपासण्या करायच्या तर आरक्षणाच्या करा. माझ्या तपासण्या म्हणजे फसवाफसवीच्या तपासण्या आहेत'.

Manoj Jarange Health Update:
Aditya Thackeray News: 'अद्यापही उत्तर मिळालं नाही', स्ट्रीट फर्निचर घोटाळा प्रकरणी आदित्य ठाकरेंचं पुन्हा पालिका आयुक्तांना पत्र

'मला फक्त आरक्षण हवं आहे. गेल्या ७५ वर्षांपासून मराठा समजाने मान सन्मान वाढवला. आता त्या समाजाचा सन्मान करण्याची जबाबदारी सरकारची आहे. ७५ वर्षांपासून मराठा लढतोय, मागण्या मागत असून सरकार इतकं दूधखुळं नाही. आज मराठ्यांना कळू द्या की, त्यांनी आमच्यावर काय परतफेड केली, असे ते म्हणाले.

'आमच्या मुलांनाही आरक्षण हवं. सरसगट आरक्षण सगळ्यांचं बसतं. मग आमचं आरक्षण कसं बसत नाही. व्यवसायानुसार इतरांना आरक्षण आहे, मग आम्हाला का नाही? आम्हाला सरकार मुर्ख समजत आहे. आम्ही डोक्यावर चालतो आणि ते पायावर चालतात का? आम्ही महाराष्ट्रातील नागरिक नाहीत का? त्यांना आरक्षण आहे, मग आम्हाला आरक्षण का नाही, असे ते पुढे म्हणाले.

तत्पूर्वी, मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती नाजूक होत आहे .त्यामुळे डॉक्टरांना रक्तदाबाची तपासणी करू द्या, अशी मागणी ग्रामस्थांनी केली .मात्र, आरक्षण हाच माझा उपचार असल्याचं सांगत औषधी उपचारासह डॉक्टरांना तपासणी करण्यास नकार दिला.

Manoj Jarange Health Update:
Maratha Reservation: 'कायद्यात बसत नसेल तर स्पष्ट सांगा, खेळ करू नका', मराठा आरक्षणावर संभाजीराजे यांची रोखठोक प्रतिक्रिया

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com