Manoj Jarange News: 'मी उपोषण सोडेन, पण...'; मुख्यमंत्र्यांशी फोनवरून बोलणं झाल्यानंतर मनोज जरांगे यांचं मोठं वक्तव्य

Manoj Jarange News: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी फोनवरून संवाद झाल्यानंतर मनोज जरांगे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधत भूमिका स्पष्ट केली.
Manoj Jarange
Manoj JarangeSaam tv

Manoj Jarange News In Marathi

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मराठा आंदोलक मनोज जरांगे यांची फोनवरून पाच मिनिटे चर्चा झाली. मंत्री उदय सामंत यांनी मुख्यमंत्री शिंदे आणि मनोज जरांगे यांच्यात चर्चा घडवून आणली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी फोनवरून संवाद झाल्यानंतर मनोज जरांगे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधत भूमिका स्पष्ट केली. (Latest Marathi News)

मनोज जरांगे म्हणाले, मुख्यमंत्र्यांसोबत दोन्ही समित्याबाबत चर्चा झाल्या. त्यांना आम्ही एक महिन्याचा वेळ दिला. मुख्यमंत्र्यांनी उद्या उपोषण सोडवण्यासाठी येणार असल्याचं आश्वासन दिलं आहे. एक महिना दिला म्हणजे दिला. सरकारने आता त्यावर निर्णय घ्यावा. उद्या मुख्यमंत्री आले तर उपोषण सोडू तसा शब्द दिला आहे'.

Manoj Jarange
Chhagan Bhujbal: अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ अॅक्शन मोडमध्ये; गोरगरीब कुटुंबांसाठी अधिकाऱ्यांना दिले महत्वाचे निर्देश

मनोज जरांगे पुढे म्हणाले,'मुख्यमंत्री उद्या नाही आले तर आपलं उपोषण असंच चालू राहील. मुख्यमंत्री शिंदे उद्या याबाबत सकाळी माहिती देणार आहेत. माझ्या तब्येतीची काळजी लागल्याने मुख्यमंत्री रात्री झोपले नव्हते असं त्यांनी सांगितलं'.

मनोज जरांगे यांची सरकारसमोर मोठी अट

तत्पूर्वी, मनोज जरांगे यांना मुख्यमंत्री शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी उपोषण सोडण्याची विनंती केली आहे. मात्र, मनोज जरांगे यांनी उपोषण सोडण्यास तयार आहे, पण उपोषणस्थळी मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावं अशी त्यांनी ठेवली आहे.

Manoj Jarange
Barsu Refinery: कोकणातील बारसू प्रकल्पावर मोठी अपडेट; अरेबियाचे राजकुमार -PM मोदींमध्ये नेमकी चर्चा काय?

मंत्री उदय सामंत यांनी घेतली जरांगे यांची भेट

उद्योगमंत्री उदय सामंत मनोज जरांगे पाटील यांच्यासाठी खास संदेश घेऊन विशेष विमानाने जालन्यातील आंतरवाली सराटीत दाखल झाले. उद्योग मंत्री उदय सामंत जळगावहून विशेष विमानाने जालन्यात पोहोचले होते. जालन्यात पोहोचल्यानंतर मंत्री उदय सामंत यांनी जरांगे यांची भेट घेतली. मंत्री सामंत हे गेली दोन तास जरांगे यांच्या जवळ बसून होते. मंत्री सामंत यांनीच जरांगे यांना मुख्यमंत्र्यांना फोन लावून दिला. त्या दोघांनी फोनवर दोन मिनिटे चर्चा केली.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com