Amruta Fadnavis : मॅम अमृता नाही, माँ अमृता... मिसेस फडणवीसांच्या कामाने मंत्री लोढा प्रभावित
Mangal Prabhat Lodha praises Amruta Fadnavis : अमृता फडणवीस यांच्या कामाने मंत्री मंगल प्रभात लोढा प्रभावित झाले आहेत. अमृता फडणवीस यांनी चौपाटीवरील कचरा साफ केला, त्याशिवाय मुलांसाठीही त्या एनजीओमार्फत काम करतात, त्यामुळे लोढा प्रभावित झाले. यापुढे 'अमृता मॅम' ऐवजी 'अमृता माँ' बोलण्याचा मानस यावेळी त्यांनी बोलून दाखवला. त्याशिवाय मिसेस फडणवीस यांना राजकारण येण्याची ऑफऱही दिली.
काय म्हणाले मंगल प्रभात लोढा ?
चौपाटीवरील कचरा साफ करता ही चांगली गोष्ट आहे. पण राज्यातील राजकारणात जो कचरा आलेला आहे, तो साफ करण्यासाठी आपण पुढाकार घ्यावा, असे म्हणत मंगल प्रभात लोढा यांनी मिसस फडणवीस यांना राजकारणात सक्रीय होण्याची विनंती केली.
अमृता फडणवीस यांनी आईचे रूप घेतलेले आहे. मुला मुलींसाठी त्या जे काम करत आहेत. त्यामुळे मी आजपासून त्यांना मॅम अमृता नाही तर माँ अमृता फडणवीस म्हणेल, असेही यावेळी ते म्हणाले.
संजय शिरसाट काय म्हणाले ?
मंगलप्रभात लोढा यांच्या वक्तव्याविषयी शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी प्रतिक्रिया दिली. मंगल प्रभात लोढा यांनी कुणाला काय म्हणून हाक मारावी हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे, असे ते म्हणाले.
वर्सोवा चौपाटीवर स्वच्छता मोहीम -
अनंत चतुर्दशीनंतर मुंबईच्या वर्सोवा चौपाटीवर मुंबईतील सर्वात मोठी स्वच्छता मोहीम राबवली गेली. मुंबई महानगरपालिका आणि अमृता फडणवीस यांच्या दिव्यज फाउंडेशनच्या माध्यमातून ही स्वच्छता मोहीम राबवली. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्या दिव्य फाउंडेशनच्या माध्यमातून स्वच्छता मोहीम राबवली.अमृता फडणवीस स्वतः स्वच्छता मोहिमेत सहभागी झाल्या होत्या. विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर, पालकमंत्री मंगल प्रभात लोढा, पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर, स्थानिक आमदार भारती लव्हेकर, पालिका आयुक्त भूषण गगरानी, पर्यावरणवादी अफरोज शाह आणि शेकडो नागरिक, विविध शाळेतील विद्यार्थी या सफाई मोहिमेत सहभागी झाले होते.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.