Mandwa Speed Boat Fire: भरसमुद्रात खासगी स्पीड बोटीला अचानक आग, दोन खलाशी जखमी

Alibaug Mandwa Speed Boat Fire: रायगडच्या मांडवा येथे खासगी स्पीड बोटीला अचानक आग लागल्याची घटना घडली आहे. समुद्र किनारी पार्क केलेल्या स्पीड बोटीला ही आग लागली. या आगीत दोन खलाशी जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे.
Mandwa Speed Boat Fire
Mandwa Speed Boat FireSaam tv
Published On

सचिन कदम, रायगड

Alibaug Mandwa Speed Boat Fire:

रायगडच्या मांडवा येथे खासगी स्पीड बोटीला अचानक आग लागल्याची घटना घडली आहे. समुद्र किनारी पार्क केलेल्या स्पीड बोटीला ही आग लागली. या आगीत दोन खलाशी जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे. या घटनेनंतर समुद्रात असलेल्या बोटीवर असलेल्या लोकांमध्ये एकच भीतीचं वातावरण पसरलं. (Latest Marathi News)

मिळालेल्या माहितीनुसार, अलिबाग येथील मांडवा बंदरात उभ्या असलेल्या बेलवेडर या खासगी स्पीड बोटीने अचानक पेट घेतल्याची घटना घडली. शनिवारी दुपारी १ वाजेच्या सुमारास ही घटना घडली आहे. या आगीत बोटमधील दोघे खलाशी जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी आलीबाग येथे हलविण्यात आले आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Mandwa Speed Boat Fire
Rajesh Tope Car Attacked : माजी मंत्री राजेश टोपेंच्या कारवर हल्ला; दगडफेक झाली, काळं फासण्याचा प्रयत्न

एसीसाठी जनरेटरचे कनेक्शन करीत असताना अगर बॅटरी कनेक्शनमधील बिघाड दुरुस्त करत असताना स्फोट झाला. त्यानंतर ही आग लागल्याची प्राथमिक माहिती पुढे येत आहे. आग लागल्याची माहिती मिळताच मांडवा येथील सागरी पोलीस घटनास्थळी पोहोचले.

या सागरी पोलिसांना बोटीला लागलेली आग विझविण्यात यश आलं आहे. तर या आग आणि स्फोटादरम्यान बोटचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

Mandwa Speed Boat Fire
Palghar Crime News : आदिवासी विकास महामंडळाच्या तत्कालीन प्रादेशिक अधिकारी, लिपीक यांच्यासह दोन गिरणी मालकांवर गुन्हा दाखल;जाणून घ्या प्रकरण

परभणीत धावत्या कारने घेतला पेट

परभणी शहरात धावत्या कारने अचानक पेट घेतल्याची घटना घडली आहे. आज शनिवारी सकाळच्या सुमारास वसमत रोडवर ही घटना घडली.सुदैवाने कारमधील व्यक्ती लवकर बाहेर आल्याने मोठा अनर्थ टळला आहे. या बर्निंग कारच्या थरारामुळे या रस्त्यावरील वाहतूक विस्कळीत झाली. ही कार चंद्रपूरहून नाशिककडे जात होती. या कारमध्ये एकूण सहाजण होते.

शहरातील वसमत रोडवरील औद्योगिक वसाहत परिसरात कार आल्यावर धूर निघत असल्याचे लक्षात आले. कारला आग लागल्यानंतर कारमधील सर्व व्यक्ती बाहेर पडल्या. त्यानंतर बघता बघता गाडीने पेट घेतला.

या ठिकाणी उपस्थित असलेल्या नागरिकांनी अग्निशमन दलाला दिली. नागरिकांच्या मदतीने आग विझविली. सुदैवाने या घटनेत जीवीतहानी झाली नाही. या कारला नेमकी आग कशामुळे लागली हे मात्र समजू शकले नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com