मांडओहळ, काळू प्रकल्प ओव्हर फ्लो

मांडओव्हळ प्रकल्प
मांडओव्हळ प्रकल्पसाम टीव्ही
Published On

अहमदनगर ः पारनेर तालुक्यातील मांडओहळ धरण व काळू लघू प्रकल्पात सोमवारी (ता. ४) सायंकाळी झालेल्या पावसाने मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक झाली. संध्याकाळपर्यंत मांडओहळ धरण व काळू प्रकल्पही पाण्याने तुडुंब भरले, अशी माहिती पाटबंधारे विभागाचे शाखा अभियंता अभिजित मोरे यांनी दिली.

मांडओव्हळ प्रकल्प
आ. नीलेश लंकेंच्या घरात शरद पवार घामाघूम!

धरण परिसरातील पिंपळगाव रोठा, सावरगाव, काळेवाडी, नांदूर पठार, कारेगाव या ठिकाणी सोमवारी सायंकाळी झालेल्या पावासामुळे मांडओहळ धरणात मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक झाली. ३९९ दशलक्ष घनफूट क्षमता असणाऱ्या धरणात ९९ टक्के पाणीसाठा झाला आहे. धरणातील पाण्याचा पुढील दीड वर्षे उपयोग होतो. तालुक्याला याच धरणातून दुष्काळात टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जातो.

२८९ दशलक्ष घनफूट क्षमता असणारा काळू लघू प्रकल्पही पूर्ण क्षमतेने भरला आहे. या प्रकल्पावरून भाळवणी, गोरेगाव, धोत्रे, हिवरे कोरडा, माळकूप, पाडळीतर्फे कान्हूर या गावांच्या पाणीयोजना आहेत. त्यामुळे या गावांचा पाणीप्रश्न मिटला आहे. या प्रकल्पाखाली असणारा अंकुर बंधारा ही भरला असल्याची माहिती ढवळपुरीचे सरपंच डाॅ. राजेश भनगडे यांनी दिली. ढोकी नंबर एक व दोन तलावांत पाणीसाठा अत्यल्प आहे. तिखोल परिसरातील तलावांतही पाण्याची आवक सुरू असल्याचे माजी सभापती अरुण ठाणगे यांनी सांगितले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com