बारामतीच्या माळेगाव सहकारी साखर कारखान्याची निवडणूक ऐन रंगात आलीय... अजित पवार, रंजन तावरे, सुप्रिया सुळेंसह दिग्गज प्रचाराच्या मैदानात उतरलेत.. आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत..तर अजित पवार थेट चेअरमनपदाच्या स्पर्धेत उतरलेत....तर चंद्रराव तावरेंनी अजित पवारांना खोचक टोला लगावलाय....
एवढंच नाही तर सुप्रिया सुळेंनी यशवंतराव चव्हाणांच्या विचारांचा उल्लेख करत अजित पवारांना डिवचलंय...लोकसभा आणि विधानसभेनंतर पुन्हा पवार विरुद्ध पवार संघर्ष रंगलाय... अजित पवारांच्या नेतृत्वात निळकंठेश्वर, शरद पवारांच्या नेतृत्वात बळीराजा, चंद्रराव तावरेंच्या नेतृत्वात सहकार बचाव आणि कष्टकरी शेतकरी पॅनलचे उमेदवार रिंगणात आहेत...मात्र पवार काका पुतण्यांसाठी ही निवडणूक इतकी प्रतिष्ठेची का आहे? पाहूयात....
41 वर्षानंतर अजित पवार कारखान्याच्या निवडणुकीत
20 हजार सभासदांना आपल्याकडे वळवण्याची संधी
शरद पवार आणि तावरेंचा वर्चस्व मोडून काढण्यासाठी अजित पवारांची रणनीती
बारामतीचा बालेकिल्ला राखण्यासाठी माळेगावचा कारखाना महत्वाचा
युगेंद्र पवारांकडून विधानसभेतील पराभवाचा बदला घेण्याचा प्रयत्न
पवार कुटुंबासाठी अत्यंत प्रतिष्ठेच्या असलेल्या माळेगाव सहकारी साखर कारखान्याची 22 जूनला निवडणूक होणार आहे...त्यामुळे शरद पवार बालेकिल्ला राखणार की अजित पवार चेअरमनपद पटकावणार? याकडे राज्याचं लक्ष लागलंय..
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.