Malegaon Bomb Blast: मालेगाव बॉम्बस्फोट नेमका कुणी घडवला?मालेगाव बॉम्बस्फोट, सर्व आरोपी निर्दोष

17 Years Later, No Convictions in Malegaon Bombing: मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील सर्वच आरोपी निर्दोष सुटले... मात्र आरोपींना निर्दोष सोडताना कोर्टाने नेमकं काय म्हटलंय?
Scene from Malegaon after the 2008 blast that claimed 7 lives and injured over 100 during Ramzan.
Scene from Malegaon after the 2008 blast that claimed 7 lives and injured over 100 during Ramzan.Saam Tv
Published On

2008 मध्ये राज्याला हादरवणाऱ्या मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणाचा अखेर निकाल लागला..मुख्य आरोपी साध्वी प्रज्ञासिंह सह 7 जणांना मृत्यूदंडाची शिक्षा सुनावण्याची मागणी एनआयएने कोर्टाकडे केली होती... मात्र अखेर कोर्टाने सर्वच आरोपींना निर्दोष मुक्त केलंय...

बॉम्बस्फोट घडला, मात्र बॉम्ब मोटार सायकलवर लावल्याचं सिद्ध करण्यात अपयश

प्रसाद पुरोहितने काश्मीरमधून RDX आणून घरी बॉम्ब बनवल्याचे पुरावे नाहीत

रमजानचा बंदोबस्त असताना मोटारसायकल कशी आणली, त्याचे पुरावे नाहीत

आरोपींमध्ये आर्थिक व्यवहार, मात्र दहशतवादी कारवायात पैसे वापरल्याचं अस्पष्ट

शंका आणि संशयावर आरोपीला दोषी ठरवता येत नाही

गुन्हा गंभीर मात्र न्यायालयात ठोस पुराव्यांचा अभाव

29 सप्टेंबर 2008 ला रमजान सुरु असताना मालेगावच्या भिकू चौकात बॉम्बस्फोट घडला आणि संपूर्ण देश हादरुन गेला...या स्फोटात 7 जणांचा मृत्यू तर 100 पेक्षा जास्त लोक जखमी झाले होते... तर या प्रकरणात साध्वी प्रज्ञासिंग, लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित, अजय राहिरकर, सुधाकर चतुर्वेदी, समीर कुलकर्णी, रमेश उपाध्याय आणि स्वामी अमृतानंद देवतीर्थ यांच्यासह 11 जणांना आरोपी करण्यात आलं होतं.. मात्र तब्बल 17 वर्षांनी सर्वच आरोपींची निर्दोष सुटका केलीय..

आता सर्वच आरोपींची कोर्टाने निर्दोष मुक्तता केल्याने मालेगावमध्ये बॉम्बस्फोट नेमका कुणी घडवला होता? बॉम्बस्फोटात जे सहा निरपराध मृत्युमुखी पडले त्याला जबाबदार कोण? यासाऱखे अनेक प्रश्न आता निर्माण झालेत. जे भविष्यातही अनुत्तरित राहण्याची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com