...म्हणून पंकजा मुंडेंना पालकमंत्री करा; बहिण प्रीतम मुंडेंची जाहीर सभेत मागणी

प्रीतम (Pritam Munde) यांच्या मागणीनंतर शिंदे-फडणवीस सरकार आता पंकजा मुंडे यांना मंत्रिपद देणार का?
Pankaja Munde And Pritam Munde
Pankaja Munde And Pritam MundeSaam TV
Published On

बीड: जिल्ह्याचा (Beed) विकास करण्यासाठी, पंकजा मुंडेंना (Pankaja Munde) पालकमंत्री करा, अशी मागणी भाजपा खासदार आणि पंकजा यांच्या बहिण प्रीतम मुंडे यांनी जाहीर सभेत केली आहे. त्या अंबाजोगाई येथे आयोजित कार्यक्रमात त्या बोलतं होत्या.

त्यामुळे प्रीतम (Pritam Munde) यांच्या मागणीनंतर शिंदे-फडणवीस सरकार आता पंकजा मुंडे यांना मंत्रिपद देणार का? याकडे मुंडे समर्थकांचे लक्ष लागले आहे. भाजप नेत्या पंकजा मुंडे यांना वारंवार आमदारकी, मंत्रीपदाची संधी न दिल्याने कार्यकर्त्यांनी उघड उघड नाराजी व्यक्त केली आहे.

पाहा व्हिडीओ -

मात्र, आता चक्क पंकजा मुंडे यांच्या बहीण खासदार प्रीतम मुंडे यांनी देखील आपल्या बहिणीला मंत्रीपद न देल्याने उघड नाराजी व्यक्त केली आहे. तसंच शिंदे फडणवीस सरकारमध्ये पंकजा मुंडे यांना मंत्रिपद मिळावे, अस जाहीर कार्यक्रमात बोलून दाखवलं आहे.

पंकजाताईच पुन्हा जिल्ह्याच्या पालकमंत्री म्हणून काम पहावं, अशी इच्छा देखील त्यांनी यावेळी व्यक्त केली. पंकजाताई मागील पाच वर्ष बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री असतांना, त्यांनी जिल्ह्यात राष्ट्रीय महामार्ग आणले, रेल्वे आणली, मोठे उद्योग सुरू केले.

Pankaja Munde And Pritam Munde
'शिंदे-फडणवीस सरकार कोसळून राज्यात पुन्हा महाविकास आघाडीचं सरकार येईल'

जिल्ह्याचा विकास करण्यासाठी हे महत्वाचे असते. त्यामुळे आता पुन्हा त्या बीडच्या पालकमंत्री झाल्या तर राहिलेला विकास सुद्धा पूर्ण होईल असं म्हणत प्रीतम मुंडे यांनी पंकजा मुंडेंना बीडच्या पालक मंत्री होण्याच्या शुभेच्छाही दिल्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com