Maharashtra Politics : ऐन निवडणुकीत उद्धव ठाकरेंना मोठा धक्का; माजी महापौरांकडून पक्षाचा राजीनामा

Uddhav thackeray News :ऐन निवडणुकीत उद्धव ठाकरेंना मोठा धक्का बसलाय. माजी महापौरांनी पक्षाचा राजीनामा दिला आहे.
Uddhav thackeray news
Uddhav thackeraySaam tv
Published On
Summary

ठाकरे गटाला मोठा धक्का

माजी महापौर शुभा राऊळ यांचा शिवसेनेला जय महाराष्ट्र

शुभा राऊळ भाजपमध्ये प्रवेश करण्याची चर्चा

गणेश कवडे, साम टीव्ही

ऐन निवडणुकीत ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. ठाकरे बंधूंनी वचननामा जाहीर केल्यानंतर काही वेळातच माजी महापौर शुभा राऊळ यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र ठोकला आहे. ऐन निवडणुकीत शुभा राऊळ यांनी साथ सोडल्याने ठाकरे बंधूंचं टेन्शन वाढल्याची चर्चा सुरू झाली आहे.

Uddhav thackeray news
उमेदवारांचा बिनविरोध विजय वादात, सामाजिक कार्यकर्ते कोर्टात जाणार? भाजप-शिंदे गटाचं टेन्शन वाढलं

माजी महापौर शुभा राऊळ यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. राऊळ यांनी राजीनाम्यानंतर आमदार प्रवीण दरेकर आणि मंत्री आशिष शेलार यांची भेट घेतली. त्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.

Uddhav thackeray news
उमेदवारांचा बिनविरोध विजय वादात, सामाजिक कार्यकर्ते कोर्टात जाणार? भाजप-शिंदे गटाचं टेन्शन वाढलं

शुभा राऊळ यांचं मुंबईतील दहिसर प्रभाग क्रमांक 8 मध्ये मोठं वर्चस्व आहे. त्यांच्या राजीनाम्यामुळे ठाकरेसेनेच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. राऊळ यांची भेट झाली असली तरी त्यांच्या पक्षप्रवेशाबाबत अद्याप अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. मात्र लवकरच त्या नवीन पक्षात प्रवेश करू शकतात, अशी जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

Uddhav thackeray news
मॅरेथॉनमध्ये जिंकली, पण आयुष्याच्या शर्यतीत हरली; दहावीच्या विद्यार्थिनीचा हार्ट अटॅकने मृत्यू

तत्पूर्वी, मुंबईतील प्रभाग ८ वार्डात ४ उमेदवार रिंगणात आहेत. काँग्रेस, भाजप, मनसे आणि एक अपक्ष उमेदवार रिंगणात आहे. काँग्रेसकडून रत्नप्रभा जुन्नरकर, भाजपकडून योगिता पाटील, मनसेकडून कस्तुरी रोहेकर मैदानात आहे. अपक्ष उमेदवार अम्रिता गवळी रिंगणात आहे. या प्रभागात वर्चस्व असलेल्या राऊळ यांच्या भूमिकेने काय परिणाम होईल, हे येत्या १६ जानेवारी रोजीच स्पष्ट होईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com