CM देवेंद्र फडणवीसांना मोठा धक्का; मामेभावाचा दारुण पराभव

devendra fadnavis Political news : अमरावतीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मोठा धक्का बसला आहे. त्यांच्या मामेभावाचा दारुण पराभव झालाय.
devendra fadnavis news
devendra fadnavisSaam tv
Published On
Summary

मुख्यमंत्र्यांना बसला मोठा धक्का

मुख्यमंत्र्यांच्या मावसभावाचा दारुण पराभव

मावसभावाच्या पराभवाची सर्वत्र चर्चा

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मोठा धक्का बसला आहे. एकीकडे राज्यातील बहुतेक महापालिकांवर भाजपची वाटचाल मॅजिक फिगरकडे सुरू असताना विदर्भात दोन मोठे धक्के बसले आहेत. अमरावतीमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मामेभावाचा दारुण पराभव झाला आहे. विदर्भात गड आला, पण सिंह गेला, अशी चर्चा यामुळे विदर्भात सुरू झाल्याचे बोलले जात आहे.

विदर्भातील नागपूर, चंद्रपूर, अमरावती, अकोला महापालिकांवर भाजप आघाडीवर आहे. मात्र, या महापालिकेतील काही जागांवर भाजपला धक्का बसल्याचे पाहायला मिळत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मामेभाऊ विवेक कलोती हे अमरावती महापालिकेच्या निवडणुकीच्या रिंगणात उभे होते. त्यांना पराभवाला सामोरे जावे लागलं आहे.

devendra fadnavis news
छत्रपती संभाजीनगरमध्ये मोठा राडा; दोन गटात तुफान हाणामारी

मुख्यमंत्री फडणवीसांना खरंतर विदर्भात दोन मोठे धक्के बसले आहेत. फडणवीस यांचे मामेभाऊ विवेक कलोती यांचा पराभव झाला आहे. त्याचबरोबर देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय मानले जाणारे तुषार भारतीय यांचाही पराभव झाला आहे. दोघांचा निवडणुकीत पराभव झाल्याने फडणवीसांना मोठा धक्का मानला जात आहे.

अमरावती महापालिका

एकूण जागा - 87 पैकी 44 कल हाती

भाजप - 12

शिवसेना - 02

राष्ट्रवादी - 05

काँग्रेस - 13

शिवसेना (उद्धव ठाकरे) -

राष्ट्रवादी (शरद पवार) -

महाराष्ट्र नवनिर्माण सेना -

इतर (वंचित, सप, एमआयएम, आप, बसपा युवा स्वाभिमान) - 12

(बसपा - 3)

(MIM - 6)

(युवा स्वाभिमान - 3)

devendra fadnavis news
२५ वर्षांनंतर ठाकरेंनी मुंबईची सत्ता गमावली, कोणती शिवसेना ठरली अव्वल? एक्झिट पोलचा अंदाज काय सांगतोय

अकोल्यात पालकमंत्री फुंडकर यांच्या मावसभावाचा पराभव

अकोल्यात राज्याचे कामगारमंत्री आणि पालकमंत्री आकाश फुंडकर यांचे सख्खे मावसभाऊ भाजप उमेदवार सागर शेगोकार यांचा पराभव झाला आहे. वंचितचे शहराध्यक्ष निलेश देव यांनी 1600 मतांनी पराभव केला आहे. प्रभाग क्रमांक 3 हा भाजप आणि संघाचा बालेकिल्ला मानला जातो. संघाच्या बालेकिल्ल्यात वंचित बहुजन मोठा विजय मिळवला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com