Samruddhi Mahamarg Accident: समृद्धी महामार्गावर भीषण अपघात; पती-पत्नीसह लहानग्याचा मृत्यू, दोघे जखमी

समृद्धी महामार्गावर लासुर स्टेशन येथे हडस पिंपळगाव जवळ हा अपघात झाला.
Samruddhi Mahamarg Accident
Samruddhi Mahamarg AccidentSaam TV

नवनीत तापडिया

Chhatrapati Sambhajinagar News : समृद्धी महामार्गावरील अपघातांची मालिका थांबण्याचं नाव घेत नाही. समृद्धी महामार्ग सुरु झाल्यापासून अनेक अपघात समोर आले आहेत. आजही समृद्धी महामार्गावर छत्रपती संभाजीनगर जवळ एक भीषण अपघात झाला, यात एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे.

राठोड कुटुंबीय आपल्या स्विफ्ट कारने समृद्धी महामार्गावरुन शिर्डीहून नागपूरला निघाले होते. समृद्धी महामार्गावर लासुर स्टेशन येथे हडस पिंपळगाव जवळ त्यांच्या कारला भीषण अपघात झाला.

स्विफ्ट कारने समोरील ट्रकला पाठीमागून धडक दिली. स्विफ्ट कार आणि ट्रकची धडक इतकी भीषण होती की कारचा अक्षरश: चक्काचूर झाला. (Accident News)

Samruddhi Mahamarg Accident
Chandrapur News: रेल्वेच्या इंजिनवर चढलेल्या बिबट्याचा दुर्दैवी मृत्यू; चंद्रपुरातील घटना

अपघातात पती-पत्नी व एक लहान मुलगा जागीच ठार झाला तर दोन मुले जखमी झाले आहेत. अनिल राठोड, भाग्यश्री राठोड या दांपत्यासह त्यांच्या एका मुलगा या अपघातात ठार झाला आहे. संपूर्ण कुटुंब अपघातात संपल्यानं सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. समृ्द्धी महामार्गावर वाढलेल्या अपघांची संख्या प्रशासनाची चिंता वाढवणारी आहे.

Samruddhi Mahamarg Accident
Vasant More News : 'खंडणी द्या, अन्यथा...'; मनसे नेते वसंत मोरे यांच्या मुलाला धमकी

पुणे– नाशिक महामार्गावर दोन विचित्र अपघात

चाकणवरुन नाशिकच्या दिशेने जात असलेल्‍या कंटेनरचे उताराला स्टेरिंग फेल झाले. चालकाच्‍या सदर प्रकार लक्षात येताच चालकाने प्रसंगावधान राखत कंटेनर झाडाला धडकला. तर नाशिकवरुन चाकणच्या दिशेने जात असलेल्‍या टेम्पोचा टायर फुटल्याने महामार्गावर पलटी झाला.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com