Latur Politics : महायुती सरकारने महाराष्ट्राला दिल्ली पुढे झुकवले, काँग्रेसचा भाजपवर हल्लोबोल

Congress On BJP : काँग्रेस आमदार धीरज देशमुख यांनी भाजपवर हल्लाबोल केला आहे.
महायुती सरकारने महाराष्ट्राला दिल्ली पुढे झुकवले, काँग्रेसची भाजपवर टीका
Dhiraj Deshmukh Saam Tv
Published On

पुरोगामी विचाराचा महाराष्ट्र, छत्रपती शिवरायांचा महाराष्ट्र कधीच दिल्ली पुढे झुकला नाही. परंतु, महायुती सरकारने महाराष्ट्राला दिल्ली पुढे झुकवले आहे. महाराष्ट्राच्या जनतेला अडाणी समजून अदानी उद्योगाला मदत करण्याचे धोरण या सरकारचे आहे. या माध्यमातून ते महाराष्ट्राची लूट करत असल्याचा हल्लाबोल लातूर ग्रामीण मतदारसंघाचे आमदार धिरज विलासराव देशमुख यांनी केला. ते काडगाव जिल्हा परिषद सर्कलच्या कार्यकर्त्यांसाठी आयोजित संवाद बैठकीमध्ये बोलत होते.

जागतिक आरोग्य संघटनेने केलं कौतुक

आमदार धिरज देशमुख पुढे म्हणाले, महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीला न शोभणारे काम महाराष्ट्राचे सरकार करत आहे. कोरोना काळामध्ये जर हे सरकार असते. तर जनतेचे काय झाले असते असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. जागतिक आरोग्य संघटनेने सुद्धा महाराष्ट्र सरकारने कोरोना काळामध्ये उत्तम काम केले असल्याचे म्हटले आहे.

महायुती सरकारने महाराष्ट्राला दिल्ली पुढे झुकवले, काँग्रेसची भाजपवर टीका
Haryana CM Oath Ceremony: नायब सिंह सैनी दुसऱ्यांदा बनले मुख्यमंत्री, जाणून घ्या संपूर्ण मंत्रिमंडळ

महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, तत्कालीन वैद्यकीय मंत्री अमित विलासराव देशमुख, आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी गाव-खेड्यापर्यंत लस, रेमिडेसिव्हर इंजेक्शन पुरवण्याचे काम केलेल आहे. पण त्याची जाहिरात त्यांनी कधी केली नाही. पण हे सरकार जनतेच्या पैशावर जाहिराती करत आहे.

जिल्हा परिषद शाळेच्या बांधकामासाठी सरकारकडे पैसे नाहीत. चाळीस हजार कोटीची कॉन्ट्रॅक्टदारांची बिले थकलेली आहेत. सरकार दिवाळखोरीत निघालेले आहे आणि या सरकारने छत्रपती शिवाजी महाराजांचा पुरोगामी महाराष्ट्र दिल्ली पुढे झुकवला असल्याची टीका त्यांनी केली.

महायुती सरकारने महाराष्ट्राला दिल्ली पुढे झुकवले, काँग्रेसची भाजपवर टीका
Maharashtra Lok Sabha Byelection : काँग्रेसचा राज्यातील पहिला उमेदवार ठरला

महाराष्ट्रातील उद्योग गुजरातला पळवले जात आहेत. मांजरा परिवाराने लातूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या सहकार्यांने एकाच वेळी १०० हार्वेस्टरचे (ऊस तोडणी यंत्र) वाटप केले आहे. बेरोजगारांना काम दिले आहे. मांजरा परिवार व जिल्हा मध्यवर्ती बँकेने तुती लागवड करणाऱ्या रेशीम उत्पादक शेतकऱ्यांना तीन लाखापर्यंत बिनव्याजी कर्ज दिले असल्याचे धीरच देशमुख यांनी सांगितले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com