Nawab Malik News: नवाब मलिकांना मोठा दिलासा; सुप्रीम कोर्टाकडून जामिनाला ३ महिन्यांची मुदतवाढ

Maharashtra Political News: सुप्रीम कोर्टाकडून पुन्हा जामीनाची 3 महिने मुदत वाढ देण्यात आली आहे.
NCP Nawab Malik
NCP Nawab Malik Saam TV
Published On: 

प्रमोद जगताप, प्रतिनिधी

Nawab Malik News:

राष्ट्रवादीचे नेते माजी मंत्री नवाब मलिक यांच्याबाबत एक महत्वाची बातमी समोर आली आहे. मनी लॉंड्रिग प्रकरणात सध्या जामिनावर बाहेर असलेल्या नवाब मलिकांना मोठा दिलासा मिळाला असून सुप्रीम कोर्टाकडून पुन्हा जामिनाची 3 महिने मुदत वाढ देण्यात आली आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, मनी लॉंड्रिंग (Money Londring Case) प्रकरणात सध्या जामिनावर बाहेर असलेले राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिकांच्या (Nawab Malik) जामीन अर्जावर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी पार पडली. प्रकृतीच्या कारणामुळे मलिकांना दोन महिन्यासाठी अंतरिम जामीन देण्यात आला होता. यावर सुप्रीम कोर्टात झालेल्या सुनावणीत मलिक यांचा जामीनाची मुदतवाढ ३ महिन्यांनी वाढवण्यात आली आहे.

नवाब मलिक यांची प्रकृतीत सुधारणा नाही, त्यांची किडनी अजून योग्य पद्धतीने काम करत नसल्याचे मलिक यांच्या वकिलांनी सांगितले. आम्ही ताजे रिपोर्ट सादर करत आहोत, वैद्यकिय कारण लक्षात घेता त्यांना जामीन द्यावा, असा दावा वकिलांनी केला. यावर कोर्टाने मंजुरी देत मलिकांच्या जामिनाची मुदत ३ महिन्यांमध्ये वाढवली आहे.

NCP Nawab Malik
Supriya Sule News: छगन भुजबळांचे दावे फेटाळले, सुप्रिया सुळेंचे अजितदादांच्या दोन्ही शपथविधींबाबत मोठं विधान, म्हणाल्या...

मलिकांचा पाठिंबा कोणाला?

दरम्यान, अजित पवार यांच्या बंडानंतर राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात (NCP) दोन गट पडले आहेत. त्यामुळे नवाब मलिकांचा पाठिंबा कोणाला अशा चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या होत्या. मलिक यांना बाहेर काढण्यात अजित पवार गटाने (Ajit Pawar) प्रयत्न केले असून त्यांनी अजित पवार गटाला पाठिंबा दिल्याच्याही बातम्या समोर आल्या होत्या. (Latest Marathi News)

NCP Nawab Malik
Palghar News : डीएड, बीएड, टीईटीधारक न्यायाच्या प्रतिक्षेत, आठ महिला उपाेषणकर्त्यांची प्रकृती ढासळली

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com