लवकरच महाराष्ट्र ऑक्सिजनमध्ये स्वयंपूर्ण असणारे देशातील पहिले राज्य: मुख्यमंत्री

राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज कोरोना विष्णूच्या संभाव्य तिसऱ्या लाटेत ऑक्सिजनची कमतरता भासू नये, यासाठी प्रत्येक जिल्ह्याने ऑक्सिजन बाबत स्वयंपूर्ण व्हावे. यासाठी युद्धपातळीवर काम सुरू असल्याची माहिती दिली आहे.
लवकरच महाराष्ट्र ऑक्सिजनमध्ये स्वयंपूर्ण असणारे देशातील पहिले राज्य: मुख्यमंत्री
लवकरच महाराष्ट्र ऑक्सिजनमध्ये स्वयंपूर्ण असणारे देशातील पहिले राज्य: मुख्यमंत्री Saam Tv

मुंबई : राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज कोरोना विष्णूच्या संभाव्य तिसऱ्या लाटेत ऑक्सिजनची कमतरता भासू नये, यासाठी प्रत्येक जिल्ह्याने ऑक्सिजन Oxygen बाबत स्वयंपूर्ण व्हावे. यासाठी युद्धपातळीवर काम सुरू असल्याची माहिती दिली आहे. ऑक्सिजनच्या बाबतीत महाराष्ट्र राज्य हे देशातील स्वयंपूर्ण होणारे पहिले राज्य ठरेल, असा विश्वास मुख्यामंत्र्यांनी व्यक्त केला. ते मीरा-भाईंदर Mira Bhyandar येथील ऑक्सिजन प्रकल्पाच्या लोकार्पण सोहळ्यावेळी ते बोलत होते.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते मीरा भाईंदर येथील ऑक्सिजन प्रकल्पाचे ऑनलाइन Online पद्धतीने लोकार्पण करण्यात आले आहे. पालकमंत्री एकनाथ शिंदे, आमदार प्रताप सरनाईक, मीरा-भाईंदर महानगरपालिकेचे नगरसेवक इत्यादी नेत्यांनी उपस्थिती लावली होती.

लवकरच महाराष्ट्र ऑक्सिजनमध्ये स्वयंपूर्ण असणारे देशातील पहिले राज्य: मुख्यमंत्री
'बचपन का प्यार' फेम सहदेवला मिळाली नवी कोरी कार!

सर्वप्रथम कोरोना काळात ठाणे या जिल्ह्यात ऑक्सिजन प्रकल्प उभारला होता. यामुळे ऑक्सिजनबाबतीत महाराष्ट्रातील ठाणे जिल्हा स्वयंपूर्ण झालेला पहिला जिल्हा आहे. मागील कोरोना लाटेला संघर्ष पाहता येणाऱ्या संभाव्य तिसऱ्या लाटेमध्ये कोणताही रुग्ण ऑक्सिजनपासून वंचित राहणार नाही, असा विश्वास उद्धव ठाकरे यांनी दिला.

Edited By-Sanika Gade

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com