Maharashtra Weather News: कुठे पाऊस तर कुठे ऊन; वाचा तुमच्या जिल्ह्यातील हवामानाचा अंदाज

Nandurbar, Jalna, Parbhani, Hingoli Weather Forecast in Marathi: राज्यात नागपूरसह विदर्भात पाऊस कोसळत आहे. ढगांमुळे सुर्यकिरणे पृथ्वीपर्यंत पोहचत नाहीयेत. परिणामी येथील तापमानाचा पारा चांगलाच घसरलाय. अगदी ७ ते १३ अंशापर्यंत पारा घसला आहे.
Maharashtra Weather Update: Rain Alert in Nandurbar Jalna Parbhani Till 24 April 2024
Maharashtra Weather Update: Rain Alert in Nandurbar Jalna Parbhani Till 24 April 2024Saam TV

Maharashtra Rain News:

राज्यात अनेक जिल्ह्यांत उन्हाचा पारा वाढत चालला आहे. तर काही ठिकाणी ढगाळ वातावरणासह अवकाळी पाऊस येत आहे. मंगळवारी सकाळपासूनच विदर्भातील चंद्रपूर, गडचिरोली, नंदुरबार आणि सोलापूरमध्ये ढगाळ वातावरण निर्माण झालं आहे. पुढील २ दिवस हे वातावरण कायम राहणार असून या जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आलीये.

Maharashtra Weather Update: Rain Alert in Nandurbar Jalna Parbhani Till 24 April 2024
Maharashtra Weather Updates : मुंबईकरांना पुढील २ दिवस IMD कडून हाय अलर्ट; उष्णतेच्या लाटेसह मुसळधार पावसाचा इशारा

उन्हाळा,पावसाळा की हिवाळा

राज्यात नागपूरसह विदर्भात पाऊस कोसळत आहे. ढगांमुळे सुर्यकिरणे पृथ्वीपर्यंत पोहचत नाहीयेत. परिणामी येथील तापमानाचा पारा चांगलाच घसरलाय. अगदी ७ ते १३ अंशापर्यंत पारा घसला आहे. त्यामुळे काही जिल्ह्यांमध्ये थंडी देखील वाजत आहे.

छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी आणि हिंगोली येथील काही भागांमध्ये देखील पुढील ३ तासांत मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. २४ एप्रिलपर्यंत अशाच पद्धतीने पाऊस कायम राहणार आहे. त्यानंतर २५ एप्रिलपासून तापमानात पुन्हा वाढ होईल, अशी माहिती हवामान खात्याकडून देण्यात आली आहे.

नंदुरबार जिल्ह्यात वातावरणात सतत होत असलेल्या बदलामुळे शेतकऱ्यांचं दोन वर्षापासून मोठं आर्थिक नुकसान होत आहे. सरासरीपेक्षा कमी पाऊस आणि मध्यंतरी आलेल्या अवकाळी पावसानंतर उत्पन्न देखील घटले आहे. तसेच शेतकऱ्यांच्या मालाला मिळत असलेल्या कमी भावामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या अडचणीत प्रचंड अशी वाढ झाली आहे.

Maharashtra Weather Update: Rain Alert in Nandurbar Jalna Parbhani Till 24 April 2024
Hingoli Crime : खळबळजनक! व्हिडिओ रेकॉर्ड करत विवाहित महिलेने संपवलं जीवन; धक्कादायक कारण आलं समोर

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com