Maharashtra Rain Update: वादळी वाऱ्यासह तुफान पाऊस... नदीला पूर, राज्यात कुठे काय परिस्थिती?
Maharashtra Rain UpdateSaam Tv

Maharashtra Rain Update: वादळी वाऱ्यासह तुफान पाऊस... नदीला पूर, राज्यात कुठे काय परिस्थिती?

Maharashtra Weather Update: राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाने धुमाकूळ घातलाय. या पावसामुळे उकाड्यामुळे हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळाला. या पावसामुळे काही ठिकाणी नद्यांना पूर देखील आला आहे.

राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये मान्सूनचे (Monsoon 2024) आगमन झाले तर काही जिल्ह्यांमध्ये मान्सूनपूर्व पाऊस पडत आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाने धुमाकूळ घातलाय. या पावसामुळे उकाड्यामुळे हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळाला. तर बळीराजा देखील शेतीच्या कामाला लागला आहे. या पावसामुळे काही ठिकाणी नद्यांना पूर देखील आला आहे. राज्यात कुठे काय परिस्थिती आहे हे आपण जाणून घेणार आहोत...

बीड -

बीडच्या माजलगाव तालुक्यातील अनेक भागात जोरदार पाऊस झाला. या पावसामुळे तालुक्यातील नाकलगाव- पिंपळगाव रस्त्यावरील नदीला पूर आलाय. गेल्या दोन ते तीन दिवसांपासून दररोज सायंकाळी या भागात मुसळधार पाऊस होत असल्याने पावसाळ्याच्या सुरुवातीलाच नदी, ओढे, नाले तुडुंब भरून वाहत आहेत. यामुळं जनजीवन काहीसं विस्कळीत झालं आहे.

जालना -

जालना जिल्ह्यात आज सायंकाळी अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस पडला. दरम्यान काल देखील जिल्ह्याभरात जोरदार पाऊस झाला होता. मृगाच्या धारांनी उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना या पावसाने चांगला दिलासा मिळाला. दरम्यान पेरणीसाठी शेती तयार असून आणखी दमदार पावसाची शेतकऱ्यांना प्रतीक्षा आहे. तर मृग नक्षत्रात पाऊस पडल्याने शेतकऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

Maharashtra Rain Update: वादळी वाऱ्यासह तुफान पाऊस... नदीला पूर, राज्यात कुठे काय परिस्थिती?
Pune Porsche Car Accident: विशाल अग्रवालच्या अडचणीत वाढ, आणखी एका प्रकरणात गुन्हा दाखल; नेमकं प्रकरण काय?

वाशिम -

वाशिम जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस झाला. सायंकाळच्या सुमारास वाशिम शहरासह रिसोड, मालेगाव तालुक्यात मुसळधार पावसाने हजेरी लावली. हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार आज सायंकाळच्या सुमारास मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

अकोला -

अकोला जिल्ह्यात जोरदार वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. अकोला शहरासह ग्रामीण भागात जोरदार वारा आणि पाऊस पडत आहे. वाढत्या तापमानामुळे आणि उकाड्यामुळे अकोलेकर चांगले हैराण झाले होते. मात्र आज सायंकाळच्या पावसामुळे अकोलेकरांना काहिसा दिलासा मिळाला.

Maharashtra Rain Update: वादळी वाऱ्यासह तुफान पाऊस... नदीला पूर, राज्यात कुठे काय परिस्थिती?
Pune News: पहिल्याच पावसात पुणे तुंबलं, मनसे आणि काँग्रेस आक्रमक; होडीमध्ये बसून आंदोलन

पुणे -

पुण्यात सलग पाचव्या दिवशी मुसळधार पावसाला सुरुवात झाली. आज सकाळपासून पुण्यात ढगाळ वातावरण होते. हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार, पुण्यात पुढील २ दिवस पाऊस राहण्याची शक्यता आहे. पुणे शहरातील विविध भागात पाऊस पडत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

अमरावती -

अमरावती जिल्ह्यात मान्सूनपूर्व पावसाला सुरुवात झाली आहे. जिल्ह्यात मान्सून पूर्व पाऊस दाखल झाल्याने बळीराजा सुखावला. अमरावती जिल्ह्यात मान्सूनपूर्व पाऊस दाखल झाल्यानंतर शेतकऱ्यांची उद्यापासून बी बियाणे, खते खरेदीसाठी लगबग सुरू होईल. शेतकरी मान्सूनच्या पावसाची वाट पाहत आहेत.

Maharashtra Rain Update: वादळी वाऱ्यासह तुफान पाऊस... नदीला पूर, राज्यात कुठे काय परिस्थिती?
Mumbai Coastal Road: कोस्टल रोडचा दुसरा बोगदा आजपासून प्रवाशांच्या सेवेत! EXCLUSIVE आढावा

परभणी -

परभणी जिल्हातील मानवत तालुक्यात आज सायंकाळच्या सुमारास पावसाने जोरदार हजेरी लावली. दरम्यान मानवत तालुक्यातील मानोली येथे ढगफुटी झाल्याने गावालगतच्या नाल्याला मोठयाप्रमाणात पाणी आले. दोन महिला शेतातून परत येत असताना या महिलांना पाण्याचा अंदाज न आल्याने दोन्ही महिल्या वाहून गेल्या. गावाकऱ्यांनी शोध घेत आहेत तर रंजना भास्करराव सुरवसे यांनी झाडाला पकडल्याने त्या वाचल्या. तर दुसऱ्या महिलेचा शोध सुरू आहे. रंजना सुरवसे यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Maharashtra Rain Update: वादळी वाऱ्यासह तुफान पाऊस... नदीला पूर, राज्यात कुठे काय परिस्थिती?
Mumbai Rain : मुंबईसह उपनगराला मुसळधार पावसानं झोडपलं; विक्रोळीत इमारतीचा स्लॅब कोसळून बापलेकांचा मृत्यू

बुलडाणा -

सलग दुसऱ्या दिवशीही बुलडाण्यात मुसळधार पाऊस पडत आहे. शेगाव, खामगाव, नांदुरा, बुलडाणा तालुक्यात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडत आहे. पावसाने वातावरणात गारवा निर्माण झाल्याने नागरिकांना उकाड्यापासून दिलासा मिळाला. सलग पडत असलेल्या पावसाने शेतकरी सुखावला. आगामी दोन दिवसांत खरिपाच्या पेरणीला सुरुवात होईल.

धाराशिव -

धाराशिव जिल्ह्यातील उमरगा तालुक्यात पावसाची जोरदार बॅटींग सुरु आहे. उमरगा शहरासह तालुक्यातील कदेर, एकुर्गा, नारंगवाडी आणि गुंजोटी गावात मुसळधार पाऊस पडत आहे. कदेर गावात पाणीच पाणी झाले असून गावात जाणारा रस्ता बंद झाला आहे. तर गुंजोटी गावात ही पाणी शिरले आहे. कोरेगाववाडी येथे गावात जाणाऱ्या पुलावर पाणी वाहत असल्याने वाहतूक खोळंबली आहे.

Maharashtra Rain Update: वादळी वाऱ्यासह तुफान पाऊस... नदीला पूर, राज्यात कुठे काय परिस्थिती?
Nashik Rain News Today: चांदवडमध्ये मुसळधार! Wagon R कार पाण्यात वाहून गेली, थरारक Video समोर

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News Saam TV
saamtv.esakal.com