Weather Update : राज्यात गारठा कायम; उत्तर भारतातील थंडीच्या लाटेचा परिणाम

Cold Wave Update : भारतीय हवामान खात्यानुसार, जम्मू-काश्मीर, पंजाब, हरियाणा ते बिहारपर्यंत पुढील तीन दिवस काही ठिकाणी हलके धुके आणि इतर ठिकाणी दाट धुके राहील.
Cold
Cold Saam TV
Published On

Weather Report :

उत्तर भारतात कडाक्याची थंडी आणि धुके असं सर्वत्र वातावरण आहे. उत्तर भारतातील थंडीच्या लाटेचा परिणाम राज्यातही जाणवत आहे. जम्मू-काश्मीर आणि हिमाचल प्रदेशातील उंच भागात पाऊस आणि बर्फवृष्टीमुळे बहुतांश भागात तापमानाचा पार घसरला आहे.

भारतीय हवामान खात्यानुसार, जम्मू-काश्मीर, पंजाब, हरियाणा ते बिहारपर्यंत पुढील तीन दिवस काही ठिकाणी हलके धुके आणि इतर ठिकाणी दाट धुके राहील. विभागाने याबाबत ऑरेंज आणि यलो अलर्ट जारी केला आहे. (Latest Marathi News)

Cold
Mumbai Pune Expressway: मुंबई-पुणे महामार्गावर २ तासांचा विशेष ब्लॉक; वाहतूक पूर्णत: बंद राहणार, पर्यायी मार्ग काय?

राज्यात तापमानाचा पारा घसरत आहे. किमान तापमानात चढ-उतार होत आहेत. राज्यातील अनेक भागात तापमानातील गारवा कायम आहे. आज देखील राज्यात तापमानातील घसरणीत चढ-उतार कायम राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Cold
Kalyan Crime News: '३ प्रवासी कारमध्ये बसले अन् अचानक...'; डोंबिवलीत ओला चालकासोबत घडली धक्कादायक घटना

राज्यात काल धुळे येथील कृषी महाविद्यालयात नीचांकी ८.६ अंश तापमानाची नोंद झाली. राज्यातील किमान तापमानाचा पारा १० ते २१ अंशांच्या दरम्यान आहे. आज देखील हवामानात गारवा राहील असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com