Maharashtra Unique Products : कोल्हापुरी, कोकम ते संत्री; कोणत्या जिल्ह्यात काय खास मिळतं? जाणून घ्या एका झटक्यात!

Maharashtra GI Tag List : महाराष्ट्रात विविध जिल्ह्यांतील काही प्रोडक्ट्सना GI टॅग देण्यात आला आहे. त्याच प्रोडक्टबद्दल आज आपण माहिती जाणून घेणार आहोत.
Maharashtra GI Tag List
Maharashtra Unique ProductsSaam TV
Published On

महाराष्ट्रातील संस्कृतीसह प्रत्येक जिल्ह्याची एक वेगळी ओळख आहे. तसेच प्रत्येक जिल्ह्यातील वेगवेगळ्या वस्तू सुद्धा प्रसिद्ध आहेत. मात्र महाराष्ट्रात राहणाऱ्या अनेक व्यक्तींना देखील आपल्या जिल्ह्यातील विशेष आणि खास प्रोडक्ट बाबत माहिती नाही. त्यामुळे आज याचीच माहिती या बतमितून जाणून घेणार आहोत.

कोल्हापुरी चपला

कोल्हापूरची खासियत म्हणजे येथील अस्सल गावरान कोल्हापुरी चपला. हे फूटवेअर परिधान केल्यावर प्रत्येक व्यक्तीला अगदी रुबाबदार असल्यासारखे वाटते. ही चप्पल इतकी प्रसिद्ध हिण्याचं कारण म्हणजे यावर असलेलं नक्षी काम, आकार आणि यातील टिकाऊपणा होय.

Maharashtra GI Tag List
Ranbir Kapoor: आलियाला सुद्धा आजवर 'ही' गोष्ट माहित नव्हती; रणबीरने स्वत: सांगितलं डेटींगचं सिक्रेट

सोलापूरी चादर

सोलापूरमध्ये बनवल्या जाणाऱ्या चादरी जगभर प्रसिद्ध आहेत. या चादर बनवण्यासाठी वापरले जाणारे कापड आणि यावरील नक्षी फार सुंदर असते. चा दर्जा मिळवणारी चादर हे महाराष्ट्रातील पहिले जिओग्रफिकल इंडिकेशन (GI) प्रॉडक्ट आहे.

पुणेरी पगडी

तुम्ही महाराष्ट्रात राहत असाल तर येथील पुणेरी पगडीबद्दल तुम्हाला माहिती असलीच पाहिजे. पुण्यातील ही पुणेरी पगडी वापरण्याची पद्धत हळूहळू बदलत चालली आहे. आता अनेक महाविद्यालयांमध्ये पदवी संपाद करण्याच्या कार्यक्रमात देखील विद्यार्थ्यांना पुणेरी पगडी दिली जाते. 4 सप्टेंबर 2009 मध्ये पुणेरी पगडीला (GI) ची मान्यता मिळाली.

नाशिकची द्राक्ष वाईन

नाशिकची वाईन सुद्धा जगप्रसिद्ध आहे. नाशिकमध्ये द्राक्षांचे उत्पादन जास्त होते. त्यामुळे वाईन जास्त प्रमाणात बाणवली सुद्धा जाते. येथील वाईनला GI चा दर्जा प्राप्त झाला आहे.

महाबळेश्वरमधील स्टोबेरी आणि वारली पेंटिंग

महाबळेश्वर हे राज्यातील थंड हवेचं एक प्रसिद्ध ठिकाण आहे. येथे उत्तम दर्जाची आणि गोड स्टोबेरी पिकते. तसेच येथील वारली पेंटिंग सुद्धा जग प्रसिद्ध आहे.

वायगावची हळद

वायगावची हळद सुद्धा जग प्रसिद्ध आहे. येथील हळदीला GI चा दर्जा प्राप्त झाला आहे. वायगावची हळद अन्य हळदींपेक्षा वेगळी आहे. ही हळद इतर हळदीच्या तुलनेने रंगाने गडद पिवळी असते. या हळदीने सूज आणि वेदना कमी होतात. तसेच हळदीमुळे जखमेवरील निर्जंतुकीकरण करून भरून काढण्याची गुणवत्ता असते.

नागपूरची संत्री

संत्री खावी तर नागपूरचीच. नागपूरची संत्री इतकी प्रसिद्ध आहे की या संत्रीला GI चा दर्जा प्राप्त झाला आहे. नागपूर संत्री पासून तुम्ही संत्री बर्फी सुद्धा बनवू शकता.

(कोल्हापूर) आजरामधील घनसाळ तांदूळ

घनसाळ - घन म्हणजे सुवास आणि साळ म्हणजे तांदूळ अशी घनसाळ तांदळाची फोड आहे. या तांदळाला GI चा दर्जा प्राप्त झालाय.

रत्नागिरी कोकणातील कोकम

रत्नागिरी आणि कोकणातील कोकमला GI दर्जा देण्यात आला आहे. येथील कोकम अन्य कोकमच्या तुलनेत अतिशय पौष्टिक आणि जाड असते.

मंगळवेढाची ज्वारी

ज्वारीची भाकरी घराघरात खाल्ली जाते. त्यात सर्वात उत्तम कॉलिटीची ज्वारी फक्त राज्याच्या मंगळवेढात मिळते. त्यामुळे या ज्वारीला GI दर्जा देण्यात आला आहे.

नागपूरची तूर डाळ

नागपूरच्या तूर डाळीला सुद्धा GI दर्जा देण्यात आला आहे. ही डाळ अतिशय घट्ट आणि चवदार असते.

अलिबागचा पांढरा कांदा

लाल कांदा सर्वच व्यक्ती खातात. मात्र लाल कांद्यापेक्षा पांढरा कांदा जगप्रसिद्ध आहे. हा कांदा चवीला थोडा तिखट सुद्धा असतो. तसेच हा कांदा खाल्ल्याने आपल्या आरोग्याशी संबंधित अनेक समस्या सुद्धा दूर होतात.

पुरंदरचा अंजीर

तुम्हाला महाराष्ट्रात उत्तम दर्जाचे अंजीर हवे असतील तर तच्यासाठी पुरंदर एक अतिशय उत्तम ठिकाण आहे. पुरंदरमधील अंजीरची गुणवत्ता पाहता याला GI दर्जा देण्यात आला आहे.

डहाणूचे चिकू

डहाणू हे शहर येथील चिकू या फळामुळे जगप्रसिद्ध झालं आहे. या चिकूंना GI दर्जा देण्यात आला आहे.

वेंगूर्ल्याचे काजू

काजू प्रत्येक व्यक्तीला आवडतात. काही ठिकाणी काजूची भाजी बनवली जाते. तर विविध मिठाई आणि सरबतमध्ये काजू वापरले जातात. उत्तम दर्जाचे काजू तुम्हाला वेंगूर्ल्यातच मिळतील. वेंगूर्ल्याच्या काजूंना GI दर्जा प्राप्त झाला आहे.

Maharashtra GI Tag List
Why Aamir Khan Called Mr. Perfectionist : आमिर खानला ‘बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट’चा टॅग कसा मिळाला?; शबाना आझमीचं नाव सांगत म्हणाला...

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com