Ruchika Jadhav
हळद हा मसाल्यातील असा एक पदार्थ आहे ज्याने आरोग्य, पदार्थाची चव आणि सुंदरता वाढवण्यासाठी सुद्धा उपयोग होतो.
हळदीमध्ये अँटीऑक्सीडंट, व्हिटॅमीन बी आणि व्हिटॅमीन सी असते. तसेच यामध्ये जास्त प्रमाणात पोटॅशिअम सुद्धा असते.
दररोज सकाळी चिमुटभर हळदीचे सेवन केल्याने आपल्या आरोग्यासाठी याचा भरपूर फायदा होता.
सकाळी हळदीचे पाणी प्यायल्याने त्या व्यक्तीची पचन क्षमता वाढते.
हळदीमध्ये असलेल्या जीवनसत्वांमुळे आपल्या हृदयाला कोणताही धोका राहत नाही.
काही व्यक्ती वजन कमी करण्यासाठी विविध ड्रिंक पितात. त्यांनी हळदीच्या पाण्याचे सुद्धा सेवन केले पाहिजे.
हळदी विविध आजारांवर गुणकारी असल्याने त्याने आपली रोगप्रतिकारक शक्ती सुद्धा वाढते.