Udyog Ratna Award: अभिमानास्पद! पद्मविभूषण रतन टाटा यांना 'उद्योगरत्न पुरस्कार' प्रदान

Ratan Tata: महाराष्ट्राचे पहिले उद्योगरत्न रतन टाटा; राज्य शासनाकडून 'उद्योगरत्न पुरस्कार' प्रदान
Udyog Ratna Award
Udyog Ratna AwardSaam TV
Published On

Maharashtra Udyog Ratna Award: महाराष्ट्राच्या उद्योग क्षेत्रातील नामवंत उद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी शासनामार्फत 'महाराष्ट्र उद्योग पुरस्कार' दिला जात आहे. या पुस्काराचे पहिले मानकरी पद्मविभूषण रतन टाटा ठरलेत. (Latest Marathi News)

उद्योग मंत्री उदय सामंत यांच्यासह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार रतन टाटा यांच्या निवासस्थानी दाखल झालेत. त्यांच्या हस्ते रतन टाटा यांना 'महाराष्ट्र उद्योगरत्न पुरस्काराने' गौरवण्यात आलं आहे.

Udyog Ratna Award
Maharashtra Politics: 'मोदीजींची उंची अधिक; टीका करण्यापेक्षा आत्मपरीक्षण करा..' बावनकुळेंचे शरद पवारांवर टीकास्त्र

उद्योग क्षेत्रात भरीव योगदान देणाऱ्या नामवंत उद्योजकांना महाराष्ट्र भूषण पुरस्काराच्या धर्तीवर यावर्षीपासून राज्य शासनाने ‘महाराष्ट्र उद्योग पुरस्कार’ देऊन त्यांना सन्मानित करण्याचा निर्णय घेतला आहे. उद्या या पुस्कारसोहळ्याचा भव्य कार्यक्रम पार पडणार आहे. त्यामध्ये अन्य कही उद्योजकांना देखील पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.

उद्योगमित्र पुरस्कार आदर पुनावाला यांना तसेच उद्योगिनी पुरस्कार गौरी किर्लोस्कर यांना दिला उद्या दिला जाणार आहे. तर उत्कृष्ट मराठी उद्योजक पुरस्कार विलास शिंदे यांना जाहीर झाला आहे. पुरस्कार प्रदान सोहळा २० ऑगस्टला दुपारी २ वाजता वांद्रे -कुर्ला संकुलमधील जियो वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटरमधील जास्मिन हॉलमध्ये आयोजित करण्यात आला आहे.

Udyog Ratna Award
Maharashtra Political News : शरद पवार सोबत आले तरच अजित पवारांना मुख्यमंत्रिपद मिळणार? विजय वडेट्टीवार यांचा मोठा दावा

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अध्यक्षस्थानी असणाऱ्या या कार्यक्रमात राज्यपाल रमेश बैस हे प्रमुख अतिथी असतील. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, कौशल्य विकास, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा, उद्योगमंत्री उदय सामंत यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com