Maharashtra Politics: 'मोदीजींची उंची अधिक; टीका करण्यापेक्षा आत्मपरीक्षण करा..' बावनकुळेंचे शरद पवारांवर टीकास्त्र

Chandrashekhar Bawankule News: प्रदेशाध्यक्ष पदाच्या वर्षपूर्तीनिमित्त चंद्रशेखर बावनकुळे यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे कौतुक केले.
sharad pawar and chandrashekhar bawankule
sharad pawar and chandrashekhar bawankule saam tv
Published On

रुपाली बडवे, प्रतिनिधी...

Maharashtra BJP News: भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांच्या प्रदेशाध्यक्ष पदाच्या कार्यकाळाला आज एक वर्ष पुर्ण झाले. प्रदेशाध्यक्ष पदाच्या वर्षपूर्तीनिमित्त चंद्रशेखर बावनकुळे यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी भाजपच्या आगामी वाटचालीची माहिती दिली. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदींचे त्यांनी तोंडभरुन कौतुक केले.

sharad pawar and chandrashekhar bawankule
Sharad Pawar-Ajit Pawar : शरद पवार-अजित पवार भविष्यात एकत्र येणार? बड्या नेत्याच्या दाव्यानं महाराष्ट्राचं राजकारण ढवळून निघणार

काय म्हणाले चंद्रशेखर बावनकुळे?

"विश्वगौरव, युगपुरुष नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्याकडे देशाचे नेतृत्व असताना मला प्रदेशाध्यक्षपदाची संधी मिळाली. त्यांनी जगातील सर्वोत्तम भारत निर्माण करण्याचा, एकविसाव्या शतकातील भारत घडवण्याचा संकल्प केला आहे, २०४७ मध्ये भारताला गौरवशाली करताना देश सर्व स्तरावर प्रगती करेल, तेव्हाच्या पिढ्या देखील मोदींना विसरू शकणार नाही.." असे चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यावेळी म्हणाले.

"मोदी सरकारच्या ९ वर्षाच्या कार्यकाळाचा लेखाजोखा आम्ही प्रत्येकापर्यंत पोहोचवत आहोत. मोदीजींच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत इतर कोणत्याही पक्षात जेवढे पक्षप्रवेश झाले नाहीत तेवढे पक्षप्रवेश सुरू आहेत, केवळ राजकीय नाही तर अराजकीय पक्षप्रवेश देखील होत आहे," असेही ते यावेळी म्हणाले.

sharad pawar and chandrashekhar bawankule
Tomato Price: टोमॅटोची लाली झाली कमी; दर घसरल्याने गृहिणींना दिलासा

पवारांवर साधला निशाणा....

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी नरेंद्र मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणावरुन निशाणा साधला होता. त्यांच्या या टीकेलाही चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रत्युत्तर दिले. "आमच्यासाठी पवाप साहेब आदरणीय आहेत, अनेक पंतप्रधानांसोबत त्यांनी काम केले आहे. मोदींच्या नेतृत्वाला ते चॅलेंज करतात, म्हणून आम्हाला वाईट वाटते" असे ते म्हणाले.

तसेच" मोदींवर टीका करण्यापेक्षा पक्षीय आत्मपरीक्षण करावे, मोदींची उंची अधिक आहे. असे म्हणत शरद पवार यांना ही काही दिवसात मोदींचे नेतृत्व मान्य होईल," असे मोठे विधानही चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com