प्रलंबित मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र ठेलारी महासंघाचे मुंडन आंदोलन

वनचराई समझोता झाल्यापासून आतापर्यंत वनचराई जमीन फक्त आणि फक्त कागदोपत्रीच असल्याचा आरोप महाराष्ट्र ठेलारी महासंघाने केला आहे.
प्रलंबित मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र ठेलारी महासंघाचे मुंडन आंदोलन
प्रलंबित मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र ठेलारी महासंघाचे मुंडन आंदोलनभूषण अहिरे
Published On

भूषण अहिरे

धुळे : महाराष्ट्र शासनाने मेंढपाळ ठेलारी समाजास वनचराई समझोत्यात मेंढी चराई रान मंजूर करण्यात आले आहे. वनचराई समझोता झाल्यापासून आतापर्यंत वनचराई जमीन फक्त आणि फक्त कागदोपत्रीच असल्याचा आरोप महाराष्ट्र ठेलारी महासंघाने केला आहे. प्रशासनातर्फे फक्त कागदपत्रे रंगविण्यात येत असल्याचे देखील महाराष्ट्र ठेलारी महासंघाने म्हटले आहे. Maharashtra Thelari Federation's shaving agitation to draw attention to pending demands

हे देखील पहा -

ठेलारी समाजाला वनचराई जमिनीपासून वंचित ठेवणाऱ्या वनविभागाच्या अधिकाऱ्यांचा निषेध करण्यासाठी महाराष्ट्र ठेलारी महासंघ संघटनेतर्फे वन विभागाच्या कार्यालयासमोर मुंडन करून आंदोलन करण्यात आले आहे. त्याच बरोबर वनविभागाच्या निष्क्रिय अधिकाऱ्यांचे श्राद्ध देखील यावेळी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी घातले आहे.

प्रलंबित मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र ठेलारी महासंघाचे मुंडन आंदोलन
छत्रपती संभाजीराजे साधणार "मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर जनसंवाद"!

झोपलेल्या वनविभागाच्या अधिकाऱ्यांना जाग आणण्यासाठी वेळोवेळी ठेलारी बांधवांनी विविध संघटनांतर्फे निवेदने दिलीत त्याचबरोबर मोर्चे देखील काढले. परंतु ठेलारी बांधवांच्या मागण्यांकडे उपवन विभागाच्या अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केल्यामुळे ठेलारी समाजाच्या संघटनांतर्फे अधिकारी जिवंतच नसावेत असे गृहीत धरून त्यांचे हिंदू रिती रिवाजाप्रमाणे दशक्रिया विधी करण्यासाठी मुंडन करून व श्राद्ध घालून या अधिकारांचा निषेध केला आहे.

पुढील पंधरा दिवसांमध्ये या अधिकाऱ्यांनी यानंतर देखील ठेलारी बांधवांच्या मागण्या मान्य केल्या नाहीत तर उपवन विभागाला टाळे ठोको आंदोलन करण्याचा गंभीर इशारा महाराष्ट्र ठेलारी महासंघातर्फे देण्यात आला आहे.

Edited By : Krushnarav Sathe

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com