संपुर्ण महाराष्ट्रातील मंदिरं खुली, कशी आहे तयारी; पाहा Video

गेल्या काहीपासून बंद असणारे राज्यभरातील धार्मिक स्थळं आजपासून भाविकांसाठी खुली करण्यात आली.
संपुर्ण महाराष्ट्रातील मंदिरं खुली, कशी आहे तयारी; पाहा Video
संपुर्ण महाराष्ट्रातील मंदिरं खुली, कशी आहे तयारी; पाहा VideoSaam TV
Published On

सागर आव्हाड (प्रतिनिधी- पुणे)

पुणे: गेल्या काहीपासून बंद असणारे राज्यभरातील धार्मिक स्थळं आजपासून भाविकांसाठी खुली करण्यात आली. पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर पहाटे पाच वाजता भाविकांसाठी खुले करण्यात आले असून दर्शनासाठी गणेशभक्तांनी रांगा लावल्या आहेत. श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात राज्यमंत्री दत्ता भरणे यांच्या हस्ते आरती करण्यात आली. यावेळी कोरोना नियमांचे उल्लंघन झालेले पाहायाले मिळाले.कोरोना नियमांचं पालन याठिकाणी दिसलं नाही कोरोना नियमच उल्लंघन या ठिकाणी झालं भाविक ही दर्शनासाठी येत आहेत.

संपुर्ण महाराष्ट्रातील मंदिरं खुली, कशी आहे तयारी; पाहा Video
दीड वर्षानंतर विठ्ठल-रुक्मिणी मंदिर तुळशीच्या पानांनी सजले; पाहा Video

डाॅ.माधव सावरगावे (प्रतिनिधी- औरंगाबाद)

औरंगाबादचं ग्रामदैवत असलेल्या कर्णपुरा देवीच्या नवरात्र महोत्सवाला आजपासून सुरुवात झाली आहे. सकाळी मंदिर समितीच्या वतीने घटस्थापना करून आरती करण्यात आली. शिवसेनेचे आमदार अंबादास दानवे यांनी परंपरेनुसार घटस्थापना केली. त्यांच्या हस्ते आरती करण्यात आली. आजपासून राज्यभरातील मंदिर दर्शनासाठी खुली करण्यात आल्याने सकाळपासूनच आई कर्णपुरा देवीच्या दर्शनासाठी भक्तांनी रांगा लावल्या होत्या. मात्र साडेतीनशेहून अधिक वर्षांची यात्रेची परंपरा यावर्षी रद्द झालेली आहे. भक्तांना केवळ दर्शनासाठी परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे कर्णपुरा देवी मंदिर परिसरात दुकाने, वेगळ्या साहित्य विक्रीची दुकाने लावण्यासाठी परवानगी देण्यात आली नाही. कर्णपुरा देवीचा उत्सव हा १७०७ पासून होत असतो. त्यवेळी राजा बिकानेर यांनी या मंदिराची स्थापना केली होती. १०७ वर्षांपासून सुरु असलेल्या परंपरेनुसार आज पूजा करण्यात आली.

कोल्हापूर (प्रतिनिधी- संभाजी थोरात)

लाखो भाविकांचे आराध्य दैवत असलेल्या करवीर निवासिनी अंबाबाईच मंदिर आज खुलं झालंय. कोरोना च्या पार्श्वभूमीवर गेले सहा महिने मंदिर बंद होते. आज पासून online बुकिंग करून दर्शनाला सुरुवात झाली आहे. मंगळवारी 11 वाजता दर्शानाची link खुली केली अवघ्या 10 तासात 30 हजार भाविकांनी दर्शनासाठी नोंदणी केली. नवरात्रीच्या पार्श्वभूमीवर मंदिर खुलं होत असल्याने व्यापाऱयांमध्येही उत्साह आहे. आज मंदिराची दोन द्वारे खुली करण्यात आली असून सोशल डीसन्सिंगचे पालन करून दर्शन सुरू आहे

नाशिक (प्रतिनिधी- अभिजीत सोनावने)

साडेतीन शक्तीपीठांपैकी अर्धपीठ असलेल्या सप्तश्रृंगी देवीचं मंदिरही आज पहाटेपासून भाविकांना दर्शनासाठी खुलं झालंय. सकाळी देवीच्या पूजेनंतर मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुलं करण्यात आलं. त्यानंतर आज घटस्थापनेच्या निमित्ताने देवीच्या अलंकारांची पूजा पार पडली असून नवरात्रीच्या पार्श्वभूमीवर देवीला भरजरी वस्त्रं आणि अलंकार परिधान करण्यात आले आहेत. तर मंदिराला आकर्षक फुलांची सजावट करण्यात आलीय. देवीच्या दर्शनासाठी पहाटेपासूनचं भाविकांच्या रांगा लागल्या असून मंदिर परिसर देवीच्या जयघोषानं दुमदुमून गेलाय. भाविकांना दर्शनासाठी मंदिर 24 तास खुलं राहणार असून गडावरील नवरात्रौत्सव मात्र रद्द करण्यात आलाय. मात्र देवीच्या दर्शनासाठी भाविकांना ऑनलाईन पासची अट ठेवण्यात आलीय. तर दर्शनासाठी कोविड प्रतिबंधात्मक लसीचे दोन्ही डोस अथवा 72 तास आधीपर्यंतचं कोविड रॅपीड टेस्टचं प्रमाणपत्रही बंधनकारक आहे. एका तासात बाराशे भाविकांना दर्शन घेता येईल, असं नियोजन करण्यात आलंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com