पंढरपूर: गेल्या दीड वर्षांपासून बंद असलेले विठ्ठल-रुक्मिणी मंदिर (Vittal Rukhmini Temple) आज सकाळी सहा वाजता उघडण्यात आले आहे. घटस्थापनेच्या निमित्ताने विठ्ठल रुक्मिणी मंदिराला तुळशीच्या पाना फुलांची आरास करण्यात आली आहे. ही आरास पुणे येथील भाविक राम जांभुळकर यांच्यावतीने केले केली आहे. विठ्ठल-रुक्मिणीच्या मंदिरात तुळशीच्या पाना फुलांची आरास केल्याने मंदिर हिरव्यागर्द पानाफुलांनी फुलून गेले आहे. यासाठी सुमारे दोन टन तुळशीच्या पाना फुलांचा वापर करण्यात आली आहे. याशिवाय मंदिरामध्ये आणि मंदिराच्या बाहेर आकर्षक रांगोळ्या काढण्यात आले आहे. आज पहाटेपासूनच मंदिर व मंदिर परिसरात भाविकांची लगबग सुरू झाली आहे.
दरम्यान घटस्थापनेच्या मुहूर्तावार राज्यातील सर्व धार्मीक स्थळ उघडण्यात आली आहेत. त्यामुळ भक्तांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. राज्यातील विविध ठिकाणी राज्यातील मंत्री दर्शनासाठी जात आहेत. उपमुख्यमंत्री अजीत पवारांनी सकाळी मुंबईच्या सिद्धिविनायक मंदिरात जाऊन दर्शन घेतले, त्यावेळी बोलताना भाविकांनी सर्व कोरोना नियमांचे पालन करुन दर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन अजीत पवार यांनी केले आहे. पंढरपूर बरोबरच शिर्डी साई मंदीर, पुण्यातील दगडूशेठ हलवाई मंदीरा मध्ये देखील भाविकांची लगबग दिसत आहे.
Edited By: Pravin Dhamale
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.