...अन्यथा राज्यभरात उपाेषण; महाराष्ट्र स्टेट ट्रान्सपोर्ट कामगार संघटनेचा सरकारला इशारा

प्रशासनातर्फे आश्वासन देऊन चार महिने उलटून देखील अद्यापही कुठल्याही प्रकारची हालचाल करण्यात आली नाही. यामुळे संघटनेने पुन्हा एकदा आंदाेलन छेडले आहे.
Breaking News:
Breaking News: Saam tv
Published On

Dhule News :

महाराष्ट्र स्टेट ट्रान्सपोर्ट कामगार संघटनेच्या (maharashtra state transport kamgar sanghatana) माध्यमातून आजपासून (मंगळवार) विविध प्रलंबित मागण्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी बेमुदत उपोषण आंदोलन सुरू करण्यात आले आहे. हे आंदाेलन धुळे जिल्ह्यात छेडण्यात आले आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

गेल्या चार महिन्यांपूर्वी संघटनेच्या माध्यमातून 2016 पासून महागाई भत्त्याचा फरक मिळावा त्याचबरोबर वेतन वाढीचा फरक मिळावा व इतर प्रलंबित मागण्यांसाठी उपोषण करण्यात आले होते. प्रशासनातर्फे या मागण्या मान्य करण्यासंदर्भात सकारात्मक भूमिका दाखविण्यात आल्यानंतर त्यावेळी आंदोलन मागे घेण्यात आले होते.

Breaking News:
Bharat Bandh News : 16 फेब्रुवारीला औद्योगिकसह ग्रामीण भारत बंदची हाक : आडम मास्तर

प्रशासनातर्फे आश्वासन देऊन चार महिने उलटून देखील अद्यापही कुठल्याही प्रकारची हालचाल करण्यात आली नाही. अखेर प्रशासनाचे लक्ष आपल्या मागण्यांकडे वेधण्यासाठी पुन्हा एकदा महाराष्ट्र स्टेट ट्रान्सपोर्ट कामगार संघटनेने बेमुदत उपोषणाचा पवित्रा घेतला.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

प्रशासनाने आंदाेलनाची दखल न घेतल्यास जिल्हास्तरावर सुरू असलेले उपोषण राज्यस्तरावर सुरू करण्याचा इशारा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी प्रशासनाला दिला आहे.

Edited By : Siddharth Latkar

Breaking News:
'कुक्कुटपालन'ची चाळीस कोटींची जागा कवडीमोल भावात विकली गेली; माजी मंत्री शिवाजीराव मोघेंचा आराेप, चौकशी समिती नेमण्याची मागणी

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com