
Essay Competition : cमहावीर जयंतीच्या निमित्ताने राज्यभरातील विविध शाळांमध्ये राज्यस्तरीय निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या निबंध स्पर्धेमध्ये असंख्य विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. सहभागी होणाऱ्यांना लाखो रुपयांची बक्षिसे देण्यात आली. राज्यपाल सी पी राधाकृष्णन आणि मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्याल आले.
भगवान महावीर कल्याण समितीने राज्यभरात महावीर जयंती निमित्त राज्यस्तरीय निबंध स्पर्धा आयोजित केली होती. यात १६ लाखांपेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. सहभागी विद्यार्थ्यांना भगवान महावीर यांच्या जीवनचरित्रावर निबंध लेखन करायचे होते. महावीर यांच्या विचारांना सर्वदूर पोहचवण्याच्या उद्देशाने ही स्पर्धा घेण्यात आली.
लाखो विद्यार्थ्यांमधून समितीने तीन विद्यार्थ्यांची पारितोषिकांसाठी निवड केली. छत्रपती संभाजीनगर येथील आराध्य लोढा या विद्यार्थिनीला प्रथम पारितोषिकासह ४,४४,४४४ रुपये; नांदेडच्या अक्षय ढेरे याला द्वितीय पारितोषिकासह २,२२,००० रुपये आणि यवतमाळच्या शर्वरी भोजनकरला तृतीय पारितोषिकासह १,११,००० रुपये बक्षीस म्हणून देण्यात आले आहेत.
याशिवाय भगवान महावीर कल्याण समितीने लहान गटातील विद्यार्थ्यांनाही बक्षीसे प्रदान केली आहेत. पाचवी ते आठवी लहान गटातील विद्यार्थांना ३,३३,३३३ रुपयांसह पारितोषिक देण्यात आले. ग्लोबल एक्झिम या कंपनीद्वारे बक्षीसांच्या मार्फत विद्यार्थ्यांना १ कोटी रुपये देण्यात आले आहेत. आगामी काळात मुलांच्या शिक्षणासाठी कंपनीने पैसे देऊ केले आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.