Eknath Shinde
Eknath Shinde saam tv

मोठी बातमी! यंदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मिळणार श्री विठ्ठल महापूजेचा मान

कोणत्याही योजना, विकास निधी यांची घोषणा न करण्याच्या अटीवर निवडणूक आयोगाने मुख्यमंत्र्यांच्या हस्ते महापूजा करण्यास परवानगी दिली आहे. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हे सपत्निक श्री विठ्ठलाची महापूजा करणार आहे.

सोलापूर : ऐन आषाढी एकादशीच्या (Ashadhi Ekadashi) तोंडावर राज्यातील नगरपलिका निवडणुका जाहीर होत अचारसंहिता लागू झाल्याने मुख्यमंत्र्यांच्या महापूजेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. मात्र कोणत्याही योजना, विकास निधी यांची घोषणा न करण्याच्या अटीवर निवडणूक आयोगाने मुख्यमंत्र्यांच्या हस्ते महापूजा करण्यास परवानगी दिली आहे. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हे सपत्निक श्री विठ्ठलाची महापूजा करणार आहे. (Eknath Shinde News In Marathi )

Eknath Shinde
अन्नधान्य, खाद्यपदार्थांवर 5 टक्के जीएसटी; धनंजय मुंडे यांनी केली 'ही' मागणी

संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी प्रस्थानाच्यादिवशी राज्यात राजकीय भूकंपास प्रारंभ झाला. सरकार बदलण्याची चिन्हे पालखी सोहळ्याच्या प्रस्थानांपासून सुरू झाल्याने श्रीविठ्ठलाची महापूजा कोणाच्या हस्ते होणार असा प्रश्ना निर्माण झाला होता.

अशातच शपथविधीनंतर या प्रश्नावर पडदा पडलेला असताना राज्यातील ९२ नगरपालिकांच्या निवडणुका जाहीर झाल्याने आचारसंहिता सुरू झाली. यामुळे आता मुख्यमंत्र्याच्या हस्ते महापूजा होणार का असा प्रश्न निर्माण झाला होता. याबाबत जिल्हधिकारी मिलिंद शंभरकर यांनी निवडणूक आयोगाकडे पत्रव्यवहार केला होता.

Eknath Shinde
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट

दरम्यान, निवडणूक आयोगाने मुख्यमंत्र्याच्या दौऱ्याला हिरवा कंदील दाखवला असून कोणतीही योजना किंवा निधीची घोषणा न करता मुख्यमंत्र्यांना श्रीविठ्ठलाची महापूजा करता येणार आहे. तसेच या कार्यक्रमासाठी आवश्यक त्या परवानग्या घेण्याची अट घातली आहे. कार्यकर्त्यांचा मेळावा घेण्यासही हरकत नाही.

मात्र, त्याठिकाणीही कोणतीही घोषणा करता येणार नाही, असे निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे श्रीविठ्ठलाची महापूजा कोणता मुख्यमंत्री करणार, अशी चर्चा काही महिन्यांपूर्वी सुरू होती. त्या चर्चांना निवडणूक आयोगाच्या निर्णयाने पूर्णविराम मिळाला आहे. यावर्षी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या पत्नी लता शिंदे या पहिल्यांदा श्रीविठ्ठलाची महापूजा करणार आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com