School
SchoolSaam TV

School: उन्हाळ्यात शाळा नकोच; महाराष्‍ट्र राज्‍य शिक्षण महामंडळाच मुख्यमंत्र्यांना पत्र

इयत्ता पहिली ते नववी व अकरावीच्‍या शाळा एप्रिल महिनाअखेरपर्यंत पुर्णवेळ सुरू ठेवण्‍याबाबत घेतलेला निर्णय अतार्किक आणि तुघलकी.
Published on

नागपूर : राज्‍याच्‍या शालेय शिक्षण विभागाने राज्‍यातील इयत्ता पहिली ते नववी व अकरावीच्‍या शाळा एप्रिल महिनाअखेरपर्यंत पुर्णवेळ सुरू ठेवण्‍याबाबत घेतलेला निर्णय अतार्किक आहे. कडक उन्‍हाळयाच्‍या दिवसात मुलांना शाळेत (School) बोलावून त्‍यांच्‍या आरोग्‍याशी खेळण्‍याचा हा प्रकार असून हा निर्णय त्‍वरित रद्द करावा, अशी मागणी महाराष्‍ट्र राज्‍य शिक्षण संस्‍था महामंडळाने केली आहे. (Maharashtra State Educational Institutions Corporation)

मुख्‍यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) यांना महाराष्‍ट्र राज्‍य शिक्षण संस्‍था महामंडळाने यासंदर्भात पत्र लिहिले आहे. विदर्भ व मराठवाड्यात मार्च व एप्रिल महिन्‍यात 40 अंश डीग्री सेल्‍सीयसच्‍या वर तापमान असते. ग्रामीण भागात वाहन, पाणी, वीज, शाळांच्‍या नादुरूस्त इमारती अशा अनेक समस्‍या असतात.

हे देखील पहा -

अशा स्थितीत विद्यार्थ्‍यांना शाळेत बोलावणे म्‍हणजे त्‍यांच्‍या आरोग्याशी खेळण्‍यासारखे असल्‍याचे महामंडळाचे कार्यवाह रवींद्र फडणवीस (Ravindra Fadnavis) यांनी नमूद केले आहे. शासनाचा हा निर्णय मुलांच्‍या आरोग्‍याचा विचार करता हा तुघलकी निर्णय त्‍वरित रद्द करावा, अशी मागणी या पत्राद्वारे महामंडळाने शालेय शिक्षण विभागाला केली आहे.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com