Buldhana Water Crisis: पाऊस रुसला.. बुलढाण्यासह अमरावती, अकोला जिल्ह्यावर दुष्काळाचे सावट; बळीराजा चिंतेत

Maharashtra Rain Update: बुलढाण्यासह अमरावती आणि अकोला जिल्ह्यातही पावसाने दडी मारल्याने शेतकरी संकटात सापडला आहे.
 Maharashtra Rain Crisis
Maharashtra Rain CrisisSaamtv
Published On

संजय जाधव, प्रतिनिधी...

Buldhana Water Crisis: देशभरासह राज्यातही पावसाने दडी मारली आहे. जुलै- ऑगस्ट महिन्यात धो- धो बरसणारा पाऊस यंदा मात्र थंड पडल्याने बळीराजाची चिंता वाढली आहे. पाऊस नसल्याने बुलढाण्या जिल्ह्यावर दुष्काळाचे सावट पसरले असून ऐन पावसाळ्यात टॅंकरने पाणी पुरवठा करण्याची वेळ आली आहे.

 Maharashtra Rain Crisis
Sanjay Raut News: 'राम मंदिर उद्घाटनावेळी धर्मांधतेचा आगडोंब उसळेल...' संजय राऊतांचा मोठा दावा

याबाबत सविस्तर माहिती अशी की, बुलढाणा जिल्ह्यात (Buldhana) या वर्षी कमी पावसाळा असल्याने अनेक तलाव व धरणात जलसाठा संपत आला असून विहिरींनी तळ गाठला आहे. पावसाळ्यात पिण्याच्या पाण्याचीही टंचाई भासू लागली आहे. त्यामुळे प्रशासनाने जिल्ह्यातील १२ गावात टँकरने पाणी पुरवठा सुरू केला असून जिल्ह्यातील ९९ खाजगी विहिरी अधिग्रहित केल्या आहेत.

भर पावसाळ्यात अशा प्रकारे टँकरने पाणी पुरवठा व खाजगी विहिरी अधिग्रहित करण्याची बहुदा ही पहिलीच वेळ असावी. मात्र यामुळे दुष्काळाची चाहूल लागली असून यंदा जिल्ह्यात सरासरीच्या ४८% पाऊस झालेला असल्याने भविष्यात मोठ्या प्रमाणात दुष्काळाच्या झळा सोसाव्या लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

 Maharashtra Rain Crisis
Sanjay Raut News: 'राम मंदिर उद्घाटनावेळी धर्मांधतेचा आगडोंब उसळेल...' संजय राऊतांचा मोठा दावा

बुलढाण्या जिल्ह्याप्रमाणेच अमरावती (Amaravati) व अकोला (Akola) जिल्ह्यावरही दुष्काळाची भिती निर्माण झाली आहे. अमरावती जिल्ह्यात जुलै महिन्यात अतिवृष्टीसह जोरदार पाऊस झाला. त्यामुळे शेतकऱ्यांची शेतीची कामे खरडून गेली तर अनेक ठिकाणी पिकांचे नुकसान झाले. मात्र आता पिके उगवण्याच्या अवस्थेत असल्याने पाण्याची आवश्यकता असतानाच पावसाने दडी मारल्याने शेतकरी अडचणीत आला आहे. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com