Maharashtra Rain Update: पुढच्या ५ ते ६ दिवसांत राज्यात असा राहिल पाऊस, हवामान खात्याने दिली महत्वाची अपडेट

IMD Alert: राज्यात पुढील पाच-सहा दिवस पावसाच्या हलक्या सरी बरसणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.
Maharashtra Rain Alert Weather Updates Paus
Maharashtra Rain Alert Weather Updates Paus Saam TV
Published On

IMD Rain Alert For Maharashtra:

राज्यामध्ये ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीपासूनच पावसाने (Maharashtra Rainfall) बऱ्यापैकी विश्रांती घेतली आहे. राज्यातील बऱ्याच भागामध्ये सध्या ऊन-पावासाचा खेळ सुरु आहे. चांगला पाऊस पडत नसल्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट आले आहे. त्यामुळे बळीराजा सध्या संकाटात आहे.

अशामध्ये सर्वजण चांगल्या पावसाच्या प्रतिक्षेत आहेत. अशामध्ये हवामान खात्याने (Meteorological Department) पावसाबाबत महत्वाची अपडेट दिली आहे. राज्यात पुढील पाच-सहा दिवस पावसाच्या हलक्या सरी बरसणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.

Maharashtra Rain Alert Weather Updates Paus
National Film Awards 2023: राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा; अल्लू अर्जुन, आलियाचा 'जलवा', विजेत्यांची यादी वाचा

भारतीय हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, पावसाला अनुकूल कोणतीही प्रभावी स्थिती निर्माण झाली नसल्याने राज्यात पुढील पाच ते सहा दिवस पावसाच्या हलक्या सरी बरसणार आहेत. पश्चिमी वाऱ्याची तीव्रता येत्या ४८ तासांनंतर वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या घाट भागात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.

Maharashtra Rain Alert Weather Updates Paus
Supriya Sule On Ajit Pawar: 'अजित पवार आमच्या पक्षाचे नेते, राष्ट्रवादीमध्ये कोणतीही फूट नाही', सुप्रिया सुळेंचं मोठं विधान

तसंच, कोकण-गोव्यात पुढील सातही दिवस बहुतांश ठिकाणी, मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी, मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर विदर्भात तुरळक ठिकाणी शुक्रवारी म्हणजेच उद्या मेघगर्जनेसह विजांचा कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे.

तर, शनिवार २६ ऑगस्ट ते बुधवार ३० ऑगस्ट या काळामध्ये राज्यात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. पुणे आणि परिसरात पुढील सहा दिवस हलक्या स्वरूपाचा पावसाचा अंदाज देखील हवामान खात्याने वर्तवला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com