Maharashtra Rain Update News: राज्यात पावसाचा जोर ओसरला; कोणत्याही जिल्ह्याला रेड आणि ऑरेंज अलर्ट नाही

Rain Alert in Maharashtra : राज्यात पावसाचा जोर ओसरला; कोणत्याही जिल्ह्याला रेड आणि ऑरेंज अलर्ट नाही
Maharashtra Rain Update News
Maharashtra Rain Update NewsSaam TV
Published On

Maharashtra Rain Update News: भारतीय हवामान खात्याच्या माहितीनुसार राज्यात पावसाचा जोर ओसरला असून पुढील 24 तासांकरिता राज्यातील कोणत्याही जिल्ह्याला रेड किंवा ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला नाही, अशी माहिती राज्य शासनाच्या मंत्रालय नियंत्रण कक्षाकडून देण्यात आली आहे.

राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये 65 मि मी पर्यंत पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला असून ग्रीन अलर्ट देण्यात आला आहे.

Maharashtra Rain Update News
Indian Alliance Mumbai Meeting: INDIA च्या मुंबईत होणाऱ्या बैठकीची तारीख ठरली, कोणत्या हॉटेलमध्ये होणार बैठक?

राज्यातील काही महत्वाच्या धरणांचा पाणीसाठा (दलघमी) आणि धरणांमधून सोडण्यात आलेला विसर्ग (क्यूमेक्स) खालीलप्रमाणे-:

सुर्या धामणी (ठाणे) (एकूण क्षमता २७६.३५ दलघमी) आत्तापर्यंत १८.४० क्यूमेक्स विसर्ग

गोसेखुर्द (भंडारा) (एकूण क्षमता ७४०.१७ दलघमी) आत्तापर्यंत ११८८.७४ क्यूमेक्स विसर्ग

भंडारदरा (अहमदनगर) (एकूण क्षमता ३०४.१० दलघमी) आत्तापर्यंत २३.३६ क्यूमेक्स विसर्ग

दारणा (नाशिक) (एकूण क्षमता२०२.४४  दलघमी) आत्तापर्यंत ३५.४० क्यूमेक्स विसर्ग

धोम- बलकवडी (सातारा) (एकूण क्षमता ११२.१४ दलघमी) आत्तापर्यंत २४ क्यूमेक्स विसर्ग  (Latest Marathi News)

राधानगरी (कोल्हापूर) (एकूण क्षमता २१९.९७ दलघमी) आत्तापर्यंत १२१  क्यूमेक्स विसर्ग

ऊर्ध्व वर्धा (अमरावती) (एकूण क्षमता ५६४.०५ दलघमी) आत्तापर्यंत ९४ क्यूमेक्स विसर्ग

बेंबळा (यवतमाळ) (एकूण क्षमता १८३.९४ दलघमी) आत्तापर्यंत ४० क्यूमेक्स विसर्ग

निम्न वर्धा (वर्धा) (एकूण क्षमता २१६.८७ दलघमी) आत्तापर्यंत १७.४२ क्यूमेक्स विसर्ग

वारणा (सांगली) (एकूण क्षमता ७७९.३४ दलघमी) आत्तापर्यंत २४३ क्यूमेक्स विसर्ग

कृष्णा-धोम (सातारा) (एकूण क्षमता 331.05 दलघमी) आत्तापर्यंत ३९ क्युमेक्स विसर्ग

इराई (चंद्रपूर) (एकूण क्षमता १७२.२० दलघमी) आत्तापर्यंत ३६.४० क्यूमेक्स विसर्ग

चासकमान (पुणे) (एकूण क्षमता २१४.५० दलघमी) आत्तापर्यंत ४७ क्यूमेक्स विसर्ग सुरु आहे.

रत्नागिरी जिल्ह्यातील जगबुडी नदीने धोक्याची पातळी ओलांडलेली आहे.

Maharashtra Rain Update News
Cm Eknath Shinde: आम्ही बोललो तर तोंड लपवण्याची वेळ येईल, विधानसभेतील मुख्यमंत्र्यांच्या भाषणातील ठळक 10 मुद्दे

पुढील २४ तासांकरिता किनारपट्टीलगतच्या जिल्ह्यांसाठी दुपारी २:३५ वाजता भरतीची वेळ देण्यात आली असून साधारण ४. ७ मीटर पर्यंत समुद्राच्या लाटा येण्याचा अंदाज आहे.

दरम्यान, मंत्रालय नियंत्रण कक्षाकडून ४ ऑगस्ट २०२३ रोजी  संध्याकाळी ६:०० वाजता प्राप्त आकडेवारीनुसार  महाराष्ट्र  हवामान सद्यस्थिती आणि अंदाज देण्यात आला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com