Indian Alliance Mumbai Meeting: INDIA च्या मुंबईत होणाऱ्या बैठकीची तारीख ठरली, कोणत्या हॉटेलमध्ये होणार बैठक?

Opposition Parties Mumbai Meeting: INDIA च्या मुंबईत होणाऱ्या बैठकीची तारीख ठरली, कोणत्या हॉटेलमध्ये होणार बैठक?
Indian Alliance Mumbai Meeting
Indian Alliance Mumbai MeetingSAAM TV
Published On

Indian Alliance Mumbai Meeting: इंडिया या विरोधी पक्षांच्या आघाडीच्या दोन बैठका आत्तापर्यंत पार पडल्या आहेत. या आघाडीची तिसरी बैठक आता मुंबईत होणार आहे. विरोधी पक्षांची ही बैठक 31 ऑगस्ट आणि 1 सप्टेंबर रोजी होणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईच्या पवई मधील हॉटेल 'West End' येथे ही बैठक होण्याची शक्यता. ही बैठक 25 आणि 26 सप्टेंबर रोजी करण्याचं ठरलं होतं. मात्र राहुल गांधी यांना वेळ नसल्याने पुढील तारीख ठरली असल्याचं सांगण्यात येत आहे.

Indian Alliance Mumbai Meeting
Cm Eknath Shinde: आम्ही बोललो तर तोंड लपवण्याची वेळ येईल, विधानसभेतील मुख्यमंत्र्यांच्या भाषणातील ठळक 10 मुद्दे

लोकसभा निवडणुकीत भाजपला (BJP) आव्हान देण्यासाठी 26 पक्षांनी मिळून इंडिया आघाडीची स्थापना केली आहे. या आघाडीच्या दोन बैठका आत्तापर्यंत पार पडल्या. त्यामधील पहिली बैठक ही पाटणामध्ये झाली तर दुसरी बैठक बेंगळुरूमध्ये पार पडली.

बेंगळुरमधील बैठकीत या आघाडीला इंडियन नॅशनल डेव्हलपमेंटल इन्क्लुसिव्ह अलायन्स (INDIA) असं नाव देण्यात आल्याचे जाहीर केले होते. त्यानंतर आता इंडिया आघाडीची तिसरी बैठक मुंबईत (Mumbai) होणार असून 31 ऑगस्ट आणि 1 सप्टेंबर रोजी होणार असल्याचे सांगितले जात आहे. (Latest Marathi News)

Indian Alliance Mumbai Meeting
National Saving Certificate Scheme: बँकेत एफडी करण्याऐवजी या सरकारी योजनांमध्ये गुंतवणूक करा, मिळेल जबरदस्त फायदा

उद्धव ठाकरे, शरद पवार करणार आयोजन...

मोदीविरोधकांच्या या आघाडीमध्ये राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि राष्ट्रवादीचे (NCP) सर्वेसर्वा शरद पवारही (Sharad Pawar) सहभागी असून त्यांच्याकडून या बैठकीचे आयोजन करण्यात येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com