Raigad Rain News: रायगड जिल्ह्यात मुसळधार पाऊस.. मुंबई- गोवा महामार्गावर पाणीच पाणी; पुण्यातही बरसल्या सरी

Maharashtra Weather Update: विदर्भ, कोकणात विजांसह पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तर मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यातही पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.
Maharashtra Weather Update
Maharashtra Weather UpdateSaamtv
Published On: 

सचिन कदम, प्रतिनिधी

Maharashtra Rain News:

गणेश चतुर्थीपासून राज्यात सक्रीय झालेला पाऊस अनेक भागांत बरसत आहे. नागपूरला काल पावसाने अक्षरश: झोडपून काढलं. नागपूरसह पुणे, अहमदनगर, जळगाव आणि बीडमध्ये जोरदार पावसाने हजेरी लावली. रायगड जिल्ह्यातही आज (रविवार, २४ सप्टेंबर) पावसाचा जोर वाढल्याचे पाहायला मिळाले.

Maharashtra Weather Update
Eknath khadse News: गिरीश महाजन यांनीही इतरांना संधी द्यावी - एकनाथ खडसेंचा चिमटा

याबाबत अधिक माहिती अशी की, राज्यात पावसाचे जोरदार पुनरागमन केल्याने बळिराजाला दिलासा मिळाला आहे.  नागपुर, बीडनंतर आता रायगड जिल्ह्यातही पावसाचा जोर वाढला असून जिल्ह्यात विविध भागात मुसळधार पाऊस कोसळला.

जिल्ह्याच्या माणगाव ते नागोठणे परिसरात पावसाच्या जोरदार सरी बरसल्या. या दमदार पावसाने मुंबई गोवा महामार्गाला नाल्याचे स्वरुप आले असून महामार्गावर पाण्याचे लोंढे वाहायला लागले. महामार्गावरील सुकेळी खिंडीनजिक पावसाचे पाणी साचल्याने वाहन चालकांची चांगलीच तारांंबळ झाल्याचे पाहायला मिळाले.

पुण्यातही जोरदार पाऊस...

पुणे शहरातही (Pune Rain) सलग दुसऱ्या दिवशी दुपारच्या सुमारास पावसाच्या जोरदार सरी बरसल्या. अचानक आलेल्या पावसामुळे गणेशोत्सवासाठी आलेल्या भाविकांची चांगलीच धावपळ झाली.

हवामान खात्याने दिला होता इशारा...

दरम्यान, आज विदर्भ, कोकणात विजांसह पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तर मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यातही पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. उर्वरित राज्यात हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.  (Rain Update) 

Maharashtra Weather Update
Raju Patil News: बॅनर ऐवजी रस्त्यावर पडलेला एक खड्डा भरा; मनसे आमदार राजू पाटील यांचे कार्यकर्त्यांना आवाहन

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com