Maharashtra Weather: काळजी घ्या, सतर्क रहा! राज्यात पावसाचा जोर वाढणार, 'या' जिल्ह्यांमध्ये जोरदार बरसणार

Maharashtra Rain IMD Alert: गुजरात व मध्य प्रदेशचा काही भाग तसेच महाराष्ट्राच्या आणखी काही भागातून परतण्यासाठी परिस्थिती अनुकूल आहे. त्यामुळे आज राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये वादळी वारा आणि विजांच्या कडकटासह पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
Maharashtra Rain IMD Alert:
Maharashtra Weather ForecastSaam Tv
Published On

Maharashtra Rain News Weather Update: राज्यभरात सध्या परतीच्या पावसाचा प्रवास सुरु आहे. गेल्या दोन दिवसांपासून राज्यभरात पावसाने पुन्हा हजेरी लावली आहे. पुढील दोन ते दिवस मौसमी पाऊस गुजरात व मध्य प्रदेशचा काही भाग तसेच महाराष्ट्राच्या आणखी काही भागातून परतण्यासाठी परिस्थिती अनुकूल आहे. त्यामुळे आज राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये वादळी वारा आणि विजांच्या कडकटासह पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

Maharashtra Rain IMD Alert:
Maharashtra Politics : हरियाणात भाजपचे मित्रपक्ष 'शुन्यावर'; रोहित पवारांचा काकांना सावधतेचा इशारा, नेमकं काय म्हणाले? VIDEO

ऑक्टोबर हीट’चा चटका वाढल्यानंतर राज्याभरात परतीच्या पावसाला सुरुवात झाली आहे. पावसाळी वातावरणामुळे तापमानात घट होण्याची शक्यता आहे. आज (ता. १०) राज्यात पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज आहे. आज राज्यभरातील विविध जिल्ह्यांमध्ये वादळी वारे, विजांसह जोरदार सरींची शक्यता असल्याने राज्यात सतर्कतेचा इशारा (येलो अलर्ट) हवामान विभागाने दिला आहे.

हवामान विभागाने रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, कोल्हापूर या जिल्ह्यांमध्ये विजांसह जोरदार पावसाचा इशारा (यलो अलर्ट) दिला आहे. तसेच नगर, पुणे, सांगली, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, धाराशिव, परभणी, बुलडाणा, अकोला, वाशीम, यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली पालघर, ठाणे, रायगड, नंदूरबार, धुळे, जळगाव, नाशिक या जिल्ह्यांमध्ये विजांसह पावसाचा इशारा (येलो अलर्ट) जारी करण्यात आला आहे.

Maharashtra Rain IMD Alert:
Ratan Tata Successor: रतन टाटा यांचा उत्तराधिकारी कोण असेल? ज्याच्या हातात असेल देशातील सर्वात प्रतिष्ठित समूहाची धुरा

दरम्यान, काल दुपारपासून पुण्यासह राज्यभरातील विविध भागात पावसाने जोरदार हजेरी लावली होती. आजही अनेक भागात पाऊस कोसळणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे. परतीचा पाऊस हा गहू आणि हरभरा पिकांसाठी वरदान ठरणार आहे. रब्बी हंगामात मोठ्या प्रमाणात गहू आणि हरभरा या पिकांचं उत्पादन घेतलं जातं. हा परतीचा पाऊस दोन पिकांसाठी फायदेशीर ठरणार आहे.

Maharashtra Rain IMD Alert:
Ratan Tata Death: भारतमातेचा 'सच्चा सुपुत्र' गमावला; रतन टाटा यांच्या स्मरणार्थ राज्यात एक दिवसाचा दुखवटा; सर्व शासकीय कार्यक्रम रद्द

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com