Weather Update : महाराष्ट्राला पाऊस झोडपणार, पुढील ३ तास महत्त्वाचे; कोणत्या जिल्ह्यांना येलो अलर्ट?

Maharashtra Weather Update News : राज्यात उष्णतेचा तडाखा कायम असताना पूर्वमोसमी पावसानेही हजेरी लावली आहे. पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यात वादळी पावसासह गारपिटीची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. हवामान विभागाने ‘येलो अलर्ट’ जारी केला आहे.
Weather Update : महाराष्ट्राला पाऊस झोडपणार, पुढील ३ तास महत्त्वाचे; कोणत्या जिल्ह्यांना येलो अलर्ट?
Maharashtra Today Weather NewsSaam Tv
Published On
Summary
  • राज्यात उष्णतेसोबत पूर्वमोसमी पावसाचा प्रभाव

  • कोकण व विदर्भात उष्ण लाटेचा इशारा

  • पश्चिम महाराष्ट्र व मराठवाड्यात वादळी पावसाची शक्यता

  • काही ठिकाणी गारपिटीचा अंदाज आणि ‘येलो अलर्ट’ जारी

राज्यात उष्णतेचा चटका कायम असतानाच पूर्वमोसमी पावसानेही हजेरी लावल्याने हवामानात दुहेरी बदल जाणवत आहे. आज कोकण आणि विदर्भात दमट हवामानासह उष्ण लाटेची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. तसेच पुढील ३ तासात पश्चिम महाराष्ट्र, कोकण आणि मराठवाड्याच्या दक्षिणेकडील जिल्ह्यांत वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज असून काही ठिकाणी तुरळक गारपिटीची शक्यता लक्षात घेता ‘येलो अलर्ट’ जारी करण्यात आला आहे.

सकाळपासूनच राज्यात कडक उन्हाची तीव्रता वाढत असून दुपारनंतर वातावरणात अचानक बदल होत आहे. बुधवारी दुपारनंतर कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही भागांत हलका पाऊस झाला. पुणे आणि सातारा जिल्ह्यांत काही ठिकाणी जोरदार सरी कोसळल्या, तर तुरळक भागांत गारपिटीची नोंद झाली.

Weather Update : महाराष्ट्राला पाऊस झोडपणार, पुढील ३ तास महत्त्वाचे; कोणत्या जिल्ह्यांना येलो अलर्ट?
Mumbai : 'तुझे ते फोटो व्हायरल करेन', महिला क्रिकेटपटूला मुंबई पोलिसांकडून अटक, प्रसिद्ध व्यवसायिकाला सेक्सटॉर्शनच्या जाळ्यात अडकवलं

दरम्यान, तापमानाचा पारा अद्यापही उच्चांक गाठत आहे. गुरुवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत वर्धा येथे राज्यातील उच्चांकी ४४.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. अकोला, गडचिरोली, अमरावती, चंद्रपूर आणि यवतमाळ या जिल्ह्यांत तापमान ४३ अंशांपेक्षा अधिक राहिले. ब्रह्मपुरी, नागपूर, जळगाव, भंडारा आणि वाशीम येथेही तापमान ४२ अंशांच्या पुढे गेले.

Weather Update : महाराष्ट्राला पाऊस झोडपणार, पुढील ३ तास महत्त्वाचे; कोणत्या जिल्ह्यांना येलो अलर्ट?
Mumbai : टीम इंडियाच्या माजी क्रिकेटपटूच्या सासऱ्यांसह तिघांना अटक, मुंबई पोलिसांची कारवाई; नेमकं कारण काय?

आज मुंबई आणि ठाणे जिल्ह्यांत उष्ण व दमट हवामान राहण्याची शक्यता असून अकोला आणि वर्धा जिल्ह्यांत उष्ण लाटेचा इशारा देण्यात आला आहे. दुसरीकडे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, अहिल्यानगर, पुणे, सोलापूर, बीड, धाराशिव आणि लातूर या जिल्ह्यांत विजांसह वादळी पावसाची शक्यता आहे. तसेच पुणे घाटमाथा, सातारा, सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यांत पावसासह तुरळक गारपिटीचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. हवामानातील या बदलत्या परिस्थितीमुळे नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. दुपारच्या वेळेत अनावश्यक बाहेर पडणे टाळावे असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

Weather Update : महाराष्ट्राला पाऊस झोडपणार, पुढील ३ तास महत्त्वाचे; कोणत्या जिल्ह्यांना येलो अलर्ट?
Shocking : अमेरिकन महिलेला बेशुद्ध करून बलात्कार, होमस्टेमधील धक्कादायक प्रकार

कोकणाला पावसाने झोडपलं!

सिंधुदुर्गातील सावंतवाडीत काल रात्री वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने हजेरी लावली. सोसाट्याचा वारा आणि विजांच्या कडकडाटासह सावंतवाडी शहरात आणि ग्रामीण भागात मुसळधार पाऊस कोसळला. पावसाचा आणि वाऱ्याचा जोर इतका प्रचंड होता की संपूर्ण सावंतवाडी शहराची बत्ती गुल झाली होती. तर अनेक ठीकाणी झाडे मोडून रस्त्यावर पडली. ही झाडे रस्त्यावरून हटविण्यात आली असून नागरीकांची मात्र गैरसोय झाली होती. दरम्यान अचानक बदललेल्या हवामानामुळे नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com