SC Hearing On Maharashtra Political Crisis : ''16 नाही 39 आमदार अपात्र ठरणार''

Supreme Court Final Decision : ''16 नाही 39 आमदार अपात्र ठरणार''
Supreme Court
Supreme CourtSaam TV

SC Hearing On Maharashtra Poltical Crisis : काही तापसातच आता सत्तासंघर्षाचा निकाल जाहीर होण्याची शक्यता आहे. अशातच ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. ते म्हणाले आहेत की, ''16 नाही तर 39 आमदार अपात्र ठरणार.'' निकालाला अवघे काही तास शिल्लक असताना त्यांच्या या वक्तव्यावरून राजकीय वातावरण तापलं आहे.

Supreme Court
Maharashtra Poltical Crisis: निकालाला अवघे काही तास बाकी असताना नरहरी झिरवळ नॉट रिचेबल; चर्चांना उधाण

SC Hearing On Maharashtra Poltical Crisis : काय म्हणाले अनिल परब?

अनिल परब म्हणाले आहेत की, ''16 आमदारांना अपात्र त्यावेळीचे विधानसभेचे उपाध्यक्ष आणि तत्कालीन अध्यक्ष नरहरी झिरवळ (Narhari Zirwal) यांनी केलं आहे. त्याला हे आव्हान दिलं गेलं आहे. आमच्या दोन याचिका आहेत. एक 16 आमदारांची आहे आणि दुसरी 23 आमदारांची आहे. ज्यावेळी 16 आमदारांचा निकाल लागेल. तोच निकाल 23 आमदारांच्या बाबतीत लागू होईल.''  (Latest Marathi News)

परब म्हणाले, ''याबाबतची याचिका आधीपासूनच दाखल करण्यात आली आहे. ज्यावेळी याचा निकाल लागेल, त्यावेळी त्यांचीही (23 आमदारांची) प्रक्रिया सुरु होईल.

Supreme Court
Political Crisis: काय झाडी, काय डोंगर वाट पाहतोय तुमची, नरहरी झिरवळ...; राऊतांना म्हणायचंय तरी काय?

नाही परब म्हणाले आहेत की, ''साधारणपणे अपात्रतेचा निर्णय घेण्याचा अधिकार हा अध्यक्षांकडे असतो. मात्र स्वतः अध्यक्षच वादग्रस्त आहेत, अशा प्रकरणात अध्यक्षांनी निर्णय घेऊ नये, असं नबाम रेबिया प्रकरणात म्हटलं आहे.'' (Political News)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com