
महायुती सरकारमधला गोंधळ अजूनही संपायला तयार नाही. सरकार स्थापन झाल्यानंतर तीन आठवड्यांनी राज्याला मंत्री मिळाले आणि मंत्र्यांना खातीही मिळाली. मात्र आता पालकमंत्रिदावरून महायुतीत नवा तिढा निर्माण झालाय. अनेक जिल्ह्यांमध्ये महायुतीतल्या दोन किंवा तिन्ही पक्षांचे मंत्री आहेत. त्यामुळे जिल्हाचा बॉस कोण होणार यावरून रस्सीखेच सुरू झालीय. काही मंत्र्यांनी तर घोषणा होण्यापूर्वी पालकमंत्रिपदावर दावा ठोकलाय़. य़ात शिंदे गट सर्वात आघाडीवर आहे.
पालकमंत्रिपदावरून केवळ संभाजीनगर आणि रायगडमध्येच वाद नाही. तर अनेक जिल्ह्यांमध्ये जिल्ह्याचा बॉस कोण होणार यावरन रस्सीखेच पाहायला मिळणार आहे. नेमके कोणते जिल्हे आहेत ते पाहूयात.
पुण्याचा पालकमंत्री कोण?
अजित पवार चंद्रकांत पाटील
राष्ट्रवादी (AP)भाजप
रायगडचा पालकमंत्री कोण?
भारत गोगावलेआदिती तटकरे
शिवसेना (शिंदे)राष्ट्रवादी (AP)
बीडचा पालकमंत्री कोण?
पंकजा मुंडेधनंजय मुंडे
भाजपराष्ट्रवादी (AP)
संभाजीनगरचा पालकमंत्री कोण?
संजय शिरसाटअतुल सावे
शिवसेना (शिंदे)भाजप
कोल्हापूरचा पालकमंत्री कोण?
प्रकाश अबिटकरहसन मुश्रीफ
शिवसेना (शिंदे)राष्ट्रवादी (AP)
साताऱ्याचा पालकमंत्री कोण?
शिवेंद्रराजे भोसले जयकुमार गोरेशंभूराज देसाईमकरंद पाटील
भाजपभाजपशिवसेना (शिंदे)राष्ट्रवादी (AP)
काहींनी थेट दावा केल्यामुळे पालकमंत्रिपदावरून वाद होण्याची शक्यता आहे. मात्र तिन्ही पक्षांचे राज्यातील नेतृत्व निर्णय़ घेणार अशी सांगत शिंदे गट आणि भाजपनं सारवासारव करण्याचा प्रयत्न केलाय.
पुढील काही महिन्यांत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत. त्यामुळे जास्तीत जास्त जिल्ह्याचं पालकमंत्रिपद मिळावं यासाठी तिन्ही पक्षांमध्ये जोरदार प्रयत्न सुरू आहेत. मात्र यामुळे घोळ होऊ नये आणि पालकमंत्रिपदही विस्तार आणि खातेवाटपासारखं लटकू नये म्हणजे झालं.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.