
Maharashtra Politics : राज्याच्या राजकारणातून एक मोठी बातमी समोर आली. शिवसेना पक्षाचं नाव आणि चिन्ह मिळाल्यानंतर शिवसेनेत (शिंदे गटात) जोरदार इन्कमिंग सुरू आहे. त्यातच आता मुंबईच्या भायखळ्यातील दगडी चाळीतील शेकडो कार्यकर्त्यांनी एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत प्रवेश केला आहे. विशेष म्हणजे यात अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळीच्या भाऊ प्रदिप गवळी यांचा देखील समावेश आहे.
प्रदिप गवळी यांच्या सोबत माजी नगरसेविका वंदना गवळी यांनी देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या उपस्तिथीत शिवसेनेत (शिंदे गटात) जाहीर प्रवेश केला. वंदना गवळी या माजी आमदार अरूण गवळी यांच्या पक्षाच्या नगरसेविका होत्या. मुख्यमंत्री शिंदे यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी हा प्रवेश सोहळा पार पडला. प्रदिप गवळी आणि वंदना गवळी यांनी शिवसेनेत प्रवेश केल्याने भायखळा मतदार संघात शिवसेनेची ताकद वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
सहा-सात महिन्यात बाळासाहेबांच्या विचारांचे अनेक लोक, अनेक कार्यकर्ते विविध पक्षातील पदाधिकारी शिवसेनेत प्रवेश करत आहे. मी सगळ्यांचे स्वागत करतो. हे सरकार सर्व सामान्य लोकांचे सरकार आहे. या राज्यातल्या अगदी जिल्हा जिल्ह्यातून तालुका तालुक्यातून शहरातून अनेक लोक अनेक कार्यकर्ते विविध पक्षातले पदाधिकारी शिवसेनेमध्ये दाखल होत आहे. एवढेच नाही तर राज्याच्या बाहेरचे देशभरातले देखील आपले कार्यकर्ते पदाधिकारी राज्य प्रमुख हे देखील शिवसेनेमध्ये प्रवेश करत आहे, असं एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.