पराग ढोबळे, साम टीव्ही नागपूर
राज्यात विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महाविकास आघाडीतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आलाय. ठाकरे गट आणि कॉंग्रेसमधील धुसफूस समोर आली आहे. ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी कॅांग्रेस नागपूरचे अध्यक्ष आ. विकास ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केलाय. विकास ठाकरे यांची काय मजबूरी आहे? ते संकेत बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांना वाचवत आहे, असा सवाल अंधारे यांनी केलाय. तर देवाणघेवाण होत असल्याचा आरोप त्यांनी केलाय.
विकास ठाकरे यांच्याकडे पुरावे होते, तर ते अपघातानंतर ३६ तास गप्प का बसले? विकास ठाकरे यांचं काही स्थानिक राजकारण असू शकते. असा सुषमा अंधारे यांनी महाविकास आघाडीच्या आमदारावर गंभीर आरोप (Maharashtra Politics) केलाय. “कायदा सर्वांसाठी सारखा असला पाहिजे, बावनकुळे दबक्या आवाजात सांगतात की निष्पक्ष चौकशी व्हावी”, अशी टीका देखील त्यांनी केलीय. संकेत यांचं नाव एफआयआरमध्ये नाही, कशी निष्पक्ष चौकशी होईल? असा सवाल त्यांनी केलाय.
जे जखमी आहेत त्यांचा दबाव आहे का? फिर्यादीवर काही दबाव आहे का? याची चौकशी करणार आहे. बाकीचे दोन मित्र दारू प्यायला गेले, तेव्हा संकेत दूध प्यायला गेला होता का? असा खोचक सवाल अंधारे यांनी (Thakeray Group Leader Sushama Andhare) केलाय. अनेक गोष्टी आहे, समाजाव्या लागतील. 'गिव्ह अँड टेक' याचा अर्थ पैशाचा नाही, अनेकदा स्थानिक राजकारण जुळवून घेण्याचा प्रयत्न विकास ठाकरे करत असतील. विकास ठाकरे यांचे वक्तव्य भाजपला मदत करण्यासाठी आहे, असा टोला अंधारे यांनी लगावला आहे.
सध्या भाजपने कुठल्यातरी गृहशांतीची पूजा करण्याची आवश्यकता आहे. ते जे काही करतात, त्याच्या विपरीत सगळ्या गोष्टी होत आहेत. जागावाटपाचा प्रश्न अंतर्गत आहे, त्यावर बोलणार नसल्याचं अंधारे (Nagpur Hit And Run) म्हणाल्या. भाजपा या सगळ्यांना वापरून घेऊन संपवत आहे, यावरून अजित दादांचे प्रवक्ते वारंवार बोलत आहेत. शिंदे गटाचे नेते बोलत आहेत. ज्याला ठेच लागेल तो शहाणा होईल, हळूहळू भाजप काय चीज आहे, त्यांना कळेल. असं सुषमा अंधारे माध्यमांशी बोलताना म्हणाल्या आहेत.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.