Maharashtra Politics: नगरमध्ये महायुतीत फूट? भाजपचे विखे, अजित पवार गटाचे लंके यांच्यात संघर्ष अटळ

Maharashtra Politics: देशात लोकसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले असून नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातून लंके कुटुंबातून एक उमेदवार निवडणूक लढणार आहे. समोर कोण उभा आहे याची फिकीर न बाळगता आम्ही या निवडणुकीला सामोरे जाणार असल्याचा निर्धार माजी जिल्हा परिषद सदस्य राणी लंके यांनी व्यक्त केला आहे.
Maharashtra Politics
Maharashtra PoliticsSaam Digital
Published On

Maharashtra Politics

देशात लोकसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले असून नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातून लंके कुटुंबातून एक उमेदवार निवडणूक लढणार आहे. समोर कोण उभा आहे याची फिकीर न बाळगता आम्ही या निवडणुकीला सामोरे जाणार असल्याचा निर्धार माजी जिल्हा परिषद सदस्य राणी लंके यांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे महायुतीच्या जागावाटपावरून पेच निर्माण होण्याची शक्यता आहे.

राणी लंके यांच्या शिवस्वराज यात्रेची नगर शहरातून भव्य मिरवणूक काढत शक्तीप्रदर्शन करण्यात आलं. अजित पवार गटाचे आमदार निलेश लंके यांच्या पुढाकाराने या यात्रेला सुरुवात करण्यात आली होती. अहमदनगर लोकसभा मतदारसंघातील सर्व तालुक्यांमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार पोहोचावे यासाठी यात्रा काढल्याचं लंके यांनी म्हटलं होतं. मात्र भाजप खासदार सुजय विखे यांना शह देण्यासाठी ही यात्रा काढल्याची चर्चा सध्या सुरू आहे.  

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Maharashtra Politics
Maratha Reservation Update: मराठा नेत्यांना पदे, पैशांचं आमिष; मनोज जरांगेंकडून कानउघडणी

गेल्या काही दिवसापासून आमदार निलेश लंके आणि भाजप खासदार सुजय विखे यांच्यात राजकीय संघर्ष सुरू आहे. त्यातच आता लंके यांनी लोकसभेसाठी तयारी केल्याचे बोलले जाते. तर आपण लोकसभा निवडणूक लढवण्यास इच्छुक असल्याचं राणी लंके यांनी स्पष्ट केले आहे. याबाबत पक्षश्रेष्ठी आणि आमदार निलेश लंके निर्णय घेणार असल्याच त्यांनी म्हटलंय. त्यामुळे आगामी काळात विखे विरुद्ध लंके असा संघर्ष पाहिला मिळू शकतो.

Maharashtra Politics
Pune Police Transfer: ऐन निवडणुकीच्या तोंडावर पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या, आयुक्तांचे रात्री उशिरा आदेश

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com