Samana Editorial News: कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई यांच्या आत्महत्येचे पडसाद राजकीय मैदानातही उमटू लागले आहेत. शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी सामनामधून केंद्र सरकारवर टीका करत सनी देओलचे घर वाचवले पण नितीन देसाईंचे कर्ज फेडता आले नाही, असा गंभीर आरोप केला आहे.
सामना अग्रलेखातून टीका....
महाराष्ट्रासह संपूर्ण देश फसवाफसवीच्या बुद्धिबळात अडकून पडला आहे. रिझर्व्ह बँकेसह सर्व राष्ट्रीय यंत्रणांवर एका गटाचा कब्जा आहे. रिझर्व्ह बँकेने भाजपच्या (BJP) मर्जीतील पन्नास कर्जबुडव्यांची हजारो कोटींची कर्जे माफ केली.
पण एका नितीन देसाईने (Nitin Desai) कर्ज फेडता येत नाही म्हणून आत्महत्या केली. लोकसभा निवडणुकीत हिंदुत्व, लव्ह जिहादसारखे विषय येतील, पण हिंदुत्व शिकवणारी आजची घराणी मोगलांची मांडलिक होती. आज ही सर्व घराणी भाजपात आहेत.
भारतीय जनता पक्षाचे एक खासदार व अभिनेते सनी देओल (Sunny Deol) यांनी बँकांचे 56 कोटींचे कर्ज थकवले. त्यामुळे त्यांच्या जुहू येथील बंगल्याचा लिलाव पुकारण्यात आला. पण बँकेने पुढच्या चोवीस तासांत तांत्रिक कारण देत लिलाव रद्द केला. त्याआधी पंधरा दिवसांपूर्वी कला दिग्दर्शक नितीन देसाई यांना आत्महत्या करावी लागली.
बँकांचे कर्ज डोक्यावर असल्याने त्यांच्या ‘एनडी’ स्टुडिओवर (ND Studio) जप्तीची कारवाई सुरू झाली. त्या धक्क्यातून देसाई यांना आत्महत्येचा मार्ग स्वीकारावा लागला. कर्ज बुडवणाऱ्यांना अभय दिले जाते, पण ते भारतीय जनता पक्षाच्या गोटातील असतील तर. नितीन देसाईंचे प्राणही वाचवता आले असते."
प्रविण दरेकरांचा गंभीर आरोप...
या टिकेनंतर भाजप नेते प्रविण दरेकर यांनी संजय राऊतांवर (Sanjay Raut) पलटवार केला आहे. "नितीन देसाई हे उद्धव ठाकरेंकडे (Uddhav Thackeray) मदत मागायला गेले होते याची माझ्याकडे खात्री लायक माहिती आहे..असा गौप्यस्फोट दरेकरांनी केला.
तसेच "संजय राऊत त्यांच्या मृत्यूचे जे भांडवल करत आहेत. अनेक मराठी उद्योजक यांनी उद्धव ठाकरेंकडे मदत मागायला गेले होते पण त्यांनी तिकडून त्यांना हाकलून दिलं याची यादी मी जाहीर करणार आहे... "असेही प्रविण दरेकर म्हणाले. (Latest Marathi News)
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.