Samana Editorial News: नेहरुंवर खापर फोडणे ही राजकीय दिवाळखोरी... PM मोदींच्या संसदेतील भाषणावरुन 'सामना'तून प्रहार

Samana Editorial On PM Narendra Modi: विरोधकांच्या अविश्वास प्रस्तावाला उत्तर देताना पंतप्रधान मोदींनी केलेल्या संसदेतील भाषणावर सामना अग्रलेखातून टीका करण्यात आली आहे.
Saamana Editorial
Saamana EditorialSaam Tv
Published On

Samana Editorial: संसदेचे पावसाळी अधिवेशनात मणिपूर हिंसाचारावरुन सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये चांगलीच जुंपल्याचे पाहायला मिळाले. इंडिया आघाडीकडून मोदीसरकारविरोधात अविश्वास प्रस्ताव आणला गेला. ज्याला उत्तर देताना पंतप्रधान मोदींनी दोन तासांच्या भाषणात मणिपूर हिंसाचाराऐवजी विरोधकांवरचं टीका केली. यावरुनच पंतप्रधान मोदींवर सामनाच्या अग्रलेखातून टीका करण्यात आली आहे.

Saamana Editorial
Covid Body Bag Scam: कोविड बॉडी बॅग घोटाळा प्रकरण! किशोरी पेडणेकरांना मुंबई सत्र न्यायालयाचा दिलासा

पंतप्रधान मोदींच्या भाषणावर 'सामना'तून टीका...

"अविश्वास ठरावाच्या वेळी पंतप्रधान मोदी (Narendra Modi) यांनी संसदेत जे लांबलचक भाषण केले त्यात अहंकार, न्यूनगंड, चिडाचिड जास्त होती. मणिपूरवर ते फक्त तीन मिनिटे बोलले. मणिपूरवर (Manipur) त्यांचे भाष्य त्यांनी संसदेच्या दोन्ही सभागृहांत केले असते तर ‘इंडिया’ पक्षाला अविश्वास ठराव आणावा लागला नसता व मोदींना या वयात 2 तास 13 मिनिटांची चिडचिड करावी लागली नसती."

Saamana Editorial
Sangli : आष्टा पोलिसांची माेठी कामगिरी; कोरेगाव, पुसेगाव, फलटणसह हडपसर, जेजुरीतील 17 दुचाकी हस्तगत, तिघांना अटक

"मोदींनी त्यांच्या भाषणाने काँग्रेसला (Congress) मोठे केले. 2024 ला त्यांचा सूर्य उगवणार नाही हे त्यांच्या भाषणाने नक्की केले. ते सूर्याचे मालक नाहीत. मणिपूरमध्ये लवकरच शांतीचा सूर्य उगवेल, असे आश्वासन पंतप्रधान मोदी यांनी संसदेत दिले. ‘इंडिया’ पक्षाने आणलेल्या अविश्वास ठरावामुळे पंतप्रधानांना लोकसभेत येऊन बोलावे लागले. दोनेक तासांच्या भाषणात मणिपूरवर ते फक्त चार मिनिटे बोलले. बाकी सर्व पुराण तेच तेच आणि तेच त्यांनी काँग्रेसवरच लावले. या त्यांच्या मानसिक यातना आहेत...." असे म्हणत पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल केला आहे.

तसेच मोरारजी देसाई, अटल बिहारी वाजपेयी, व्ही. पी. सिंग हे बिगर काँग्रेसी पंतप्रधान झाले व आता दहा वर्षे स्वतः मोदी पंतप्रधान असूनही मणिपूरचे खापर नेहरूंवर (Jawaharlal Nehru) फोडणे ही राजकीय दिवाळखोरीच... असा टोलाही सामना अग्रलेखातून लगावला आहे. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com